Bookstruck

वर्ण परिवर्तनाची काही उदाहरणे

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List
१. ऐतरेय ऋषि दास अथवा अपराधी चे पुत्र होते. परंतु उच्च कोटीचे ब्राम्हण बनले आणि त्यांनी ऐतरेय ब्राम्हण आणि ऐतरेय उपनिषद यांची रचना केली. ऋग्वेद समजून घेण्यासाठी ऐतरेय ब्राम्हण अतिशय आवश्यक मानले जाते.

२. ऐलुष ऋषी दासी पुत्र होते. जुगारी आणि हीन चरित्राचे होते. परंतु नंतर त्यांनी अध्ययन केले आणि ऋग्वेदावर अनुसंधान करून अनेक अविष्कार केले. ऋषींनी त्यांना आमंत्रित करून आचार्य पदावर विराजमान केले. (ऐतरेय ब्राह्मण २.१९)

३. सत्यकाम जाबाल एका गणिकेचे (वेश्या) पुत्र होते परंतु पुढे ते ब्राम्हणत्वाला प्राप्त झाले.

४. राजा दक्ष याचा पुत्र पृषध शुद्र बनले होते, प्रायश्चित्त स्वरूप तप करून त्यांनी मोक्ष प्राप्त केला. (विष्णू पुराण ४.१.१४)
जर उत्तर रामायणातील मिथ्या कथेनुसार शूद्रांना ताप करण्यास मनाई असती तर त्यांना हे कसे शक्य झाले?

५. राजा नेदिष्ट चे पुत्र नाभाग वैश्य बनले. पुढे त्यांच्या अनेक पुत्रांनी क्षत्रिय वर्ण आपलासा केला. (विष्णू पुराण ४.१.१३)

६. धृष्ट हे नाभाग चे पुत्र होते परंतु ब्राम्हण झाले आणि त्यांच्या पुत्राने क्षत्रिय वर्ण आपलासा केला. (विष्णू पुराण ४.२.२)

७. पुढे त्यांच्याच वंशात काही ब्राम्हण झाले. (विष्णू पुराम ४.२.२)

८. भागवतानुसार राजपुत्र अग्निवेश्य ब्राम्हण झाले.

९. विष्णू पुराण आणि भागवतानुसार राथोतर क्षत्रियापासून ब्राम्हण बनले.

१०. हरित क्षत्रिय पुत्राचे ब्राम्हण बनले. (विष्णू पुराण ४.३.५)

११. क्षत्रिय कुळात जन्मलेल्या शौनक नी ब्राम्हणत्व प्राप्त केले. (विष्णू पुराण ४.८.१) वायू, विष्णू आणि हरिवंश पुराण सांगतात की शौनक ऋषींचे पुत्र कर्म भेदाने ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र वर्णाचे झाले. याच प्रकारे गृत्समद, गृत्समति आणि वीतहव्य यांची उदाहरणे आहेत.

१२. मातंग चांडाळ पुत्रापासून ब्राम्हण बनले.

१३. ऋषी पुलस्त्य यांचा पुत्र रावण आपल्या कर्मांमुळे राक्षस बनला.

१४. राजा रघु याचा पुत्र प्रवृद्ध राक्षस झाला.

१५. त्रिशंकू राजा असून देखील कर्मांमुळे चांडाळ बनले होते.

१६. विश्वामित्रांच्या पुत्रांनी शुद्र वर्ण स्वीकारला. विश्वामित्र स्वतः जन्माने क्षत्रिय होते परंतु नंतर त्यांची ब्राम्हणत्व प्राप्त केले.

१७. विदुर दासीपुत्र होता. तरीही तो ब्राम्हण झाला आणि त्याने हस्तिनापूरचे मंत्रिपद भूषवले.

१८. वत्स शुद्र कुळात उत्पन्न होऊन देखील ऋषी बनले. (ऐतरेय ब्राम्हण २.१९)

१९. मनुस्मृतीच्या प्रक्षिप्त श्लोकांवरून देखील लक्षात येते की काही क्षत्रिय जाती शुद्र बनल्या. वर्ण परिवर्तनाची साक्ष देणारे हे श्लोक मनुस्मृतीत खूप नंतरच्या काळात समाविष्ट केलेले आहेत. या परिवर्तीत जातींची नावी आहेत - पौण्ड्रक, औड्र, द्रविड, कम्बोज, यवन, शक, पारद, पल्हव, चीन, किरात, दरद, खश.

२०. महाभारत अनुसंधान पर्व (३५.१७-१८) याच सूचित कित्येक अन्य नावी देखील समाविष्ट करते - मेकल, लाट, कान्वशिरा, शौण्डिक, दार्व, चौर, शबर, बर्बर.

२१. आजही ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि दलित यांच्यात समान गोत्र मिळतात. यावरून लक्षात येते की हे सर्व एकाच पूर्वज, एकाच कुळातील वंशज आहेत. परंतु कालांतराने वर्ण व्यवस्था भरकटली आणि हे सर्व लोक कित्येक जातींमध्ये विभागले गेले.

« PreviousChapter List