Bookstruck

कालिदासाचे साहित्य

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

कालिदास हे संस्कृत साहित्य आणि भारतीय प्रतीभेच्चे उज्ज्वल नक्षत्र आहे. कालिदासाच्या जीवनावृत्ताच्या विषयी अनेक मते प्रचलित आहेत. काही लोक त्याला बंगाली मानतात. काही लोक म्हणतात की तो काश्मिरी होता. काही त्याला उत्तर प्रदेशातील म्हणून पण मानतात. परंतु बहुतांश विद्वानांची धारणा आहे की तो मालवा चा रहिवासी होता आणि सम्राट विक्रमादित्य याच्या नवरत्नांपैकी एक होता. विक्रमादित्याचा काळ हा इ. स.ल पूर्व ५७ पर्यंत मानला जातो. जो विक्रमी संवत चा आरंभ देखील आहे. या वर्षी विक्रमादित्याने भारतावर आक्रमण करणाऱ्या शकांना पराजित केले होते. कालीदासाबद्दल अशी दंतकथा देखील आहे की तो आधी निव्वळ एक मूर्ख होता. काही धूर्त पंडितांनी षड्यंत्र रचून त्याचा विवाह विद्योत्तामा नावाच्या एका परम विदुषी सोबत करून दिला. हे समजल्यावर विद्योत्तमाने कालिदासाला घरातून घालवून दिले. यामुळे दुःखी झालेल्या कालिदासाने भगवतीची आराधना केली आणि अनेक विद्या प्राप्त केल्या.

« PreviousChapter ListNext »