Bookstruck

हनुमानाच्या विवाहाचे रहस्य

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


http://www.digitalaps.com/admin/userfiles/images/the-secret-of-lord-hanuman-marriage.jpg

जय श्री राम! संकट मोचन हनुमानाच्या ब्रम्हचारी रूपाशी तर आपण सगळे परिचित आहोतच, त्यांना बालब्रम्हचारी देखील म्हटले जाते. पण असे कधी ऐकले आहे का की हनुमानाचा विवाह झाला होता आणि त्यांचे त्यांच्या पत्नीसोबत एक मंदिर देखील आहे, जिथे दर्शन घेण्यासाठी दूर दूरवरून लोक येतात?असे म्हटले जाते की भगवान हनुमानाचे त्यांच्या पत्नीदोबत दर्शन घेतल्यामुळे घरात असलेले पती-पत्नी मधील सर्व तणाव संपुष्टात येतात. आंध्र प्रदेशाच्या खम्मम जिल्ह्यामध्ये असलेले हे हनुमंताचे मंदिर अनेक अर्थांनी खास आहे. खास अशासाठी की इथे हनुमानजी आपल्या ब्रम्हचारी रुपात नव्हे तर गृहस्थी रुपात आपली पत्नी सुवर्चला हिच्या सोबत विराजमान आहेत. हनुमंताचे सर्व भक्त असेच मनात आले आहेत की ते बाल ब्रम्हचारी होते.आणि वाल्मिकी, कंभ सहित कोणतेही रामायण आणि रामचरित मानस मध्ये बालाजी च्या याच रूपाचे वर्णन मिळते. परंतु पराशर संहितेत हनुमानाच्या विवाहाचा उल्लेख आहे. याला पुरावा अहेम आंध्र प्रदेश इथे खम्मम जिल्ह्यात असलेले एक खास मंदिर जे प्रमाण आहे हनुमंतांच्या विवाहाचे.हे मंदिर आठवण करून देते राम्दुताच्या अशा चरित्राची जेव्हा त्यांना विवाहाच्या बंधनात अडकावे लागले होते. परंतु याचा अर्थ असा नाही की हनुमंत बाल ब्रम्हचारी नव्हते.पावनपुत्राचा विवाह देखील झाला होता आणि ते बाल ब्रम्हचारी देखील होते. काही विशिष्ट परिस्थितीमुळे बजरंग बलींना सुवर्चला सोबत विवाह बंधनात स्वतःला बांधून घ्यावे लागले. हनुमंतांनी भगवान सूर्याला आपला गुरु मानले होते. हनुमंत सूर्याकडून आपले शिक्षण घेत होते, सूर्य कुठेही थांबू शकत नव्हता म्हणून हनुमंताला संपूर्ण दिवस भगवान सूर्याच्या रथासोबत उडत राहावे लागे आणि भगवान सूर्य त्यांना अनेक विद्यांचे शिक्षण देत होते.परंतु हनुमंताला शिक्षण देत असताना सुर्यदेवासमोर एक दिवस धर्मसंकट उभे राहिले. एकूण ९ प्रकारच्या विद्यांपैकी ५ प्रकारच्या विद्या सूर्याने हनुमंताला शिकवल्या, परंतु उरलेल्या ४ प्रकारच्या विद्या अशा होत्या ज्या केवळ एका विवाहितालाच शिकवता येत होत्या.हनुमंत तर संपूर्ण शिक्षण घेण्याचा पण करून बसले होते आणि त्यापेक्षा कमी शिक्षणावर ते थांबायला तयार नव्हते. इकडे सूर्यासमोर संकट होते की तो धर्माच्या शिस्तीमुळे कोण अविवाहिताला काही विशिष्ट विद्या शिकवू शकत नव्हता. अशा परिस्थितीत सूर्यदेवाने हनुमंताना विवाहाचा सल्ला दिला आणि आपला पण पूर्ण करण्यासाठी हनुमानजी देखील विवाह बंधनात अडकून विद्या ग्रहण करण्यासाठी तयार झाले. परंतु हनुमानासाठी वाढू कोण असावी आणि ती कोठून मिळेल या बाबतीत सर्वच चिंतेत होते. अशात सूर्यदेवाने आपला शिष्य हनुमानाला मार्ग दाखवला. सूर्यदेवाने आपली परम तपस्वी आणि तेजस्वी कन्या सुवर्चला हिला हनुमानाशी विवाह करण्यास तयार केले.यानंतर हनुमानाने आपले सर्व शिक्षण पूर्ण केले आणि सुवर्चला कायमस्वरूपी तपश्चर्येत मग्न झाली.अशा प्रकारे हनुमानजी जरी विवाहाच्या बंधनात अडकले तरी देखील शारीरिक रूपाने ते आजही ब्राम्हचारीच आहेत.पराशर संहितेमध्ये तर असे लिहिलेले आहे की स्वतः सूर्यदेवाने या विवाहावर असे म्हटले कि, "हा विवाह ब्रह्मांडाच्या कल्याणासाठीच झाला आहे आणि याच्यामुळे हनुमंतांच्या ब्राम्हचर्यावर कोणताही परिणाम होणार नाही."

« PreviousChapter ListNext »