अशोक वाटिका उध्वस्त केली


http://www.ruchiskitchen.com/wp-content/uploads/2014/03/hanuman-in-ashik-vatika-278x300.jpg

सीता मातेची आज्ञा घेऊन हनुमान बागेत घुसला आणि फळे खाऊ लागला. त्याने अशोक वाटिकेत खूप फळे खाल्ली आणि झाडे तोडू लागला. तिथे अनेक राक्षस राखणदारी करीत होते, त्यांच्यापैकी काहींना ठार मारले. काही राक्षस आपला जीव वाचवून रावणासमोर गेले आणि तिथे जाऊन या उचापत्या वानराची खबर दिली.