Bookstruck

प्रस्तावना

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »


https://i.ytimg.com/vi/y22EK2xaQmc/hqdefault.jpg


मी हल्लीच वाचलेल्या एका पुस्तकाचेख्रिश्चन नावाचा सिंहहे शीर्षक आहे. ऍन्थनी (एस) बोर्क आणि जॉन रेंडॉल हे दोन तरुण मित्र ख्रिश्चन नांवाचा त्यांचा सिंह यांच्यातील अजब प्रेमबंध मैत्री यांची ही सत्यकथा आहे. १९७१ साली हे पुस्तक त्या दोघानी प्रथम प्रसिद्ध केले होते. त्याचे तेव्हां खूप स्वागत झाले होते. चार भाषांत ते प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर ख्रिश्चनच्या कथेवर दोन डॉक्युमेंटरी बनल्या. त्या अनेकवार टी. व्ही. दाखवल्या गेल्या अतिशय लोकप्रिय झाल्या. मूळ पुस्तक मी वाचलेले नव्हते. आतां इतक्या वर्षांनंतर २००९ सालीं या दोघानी पुस्तकाची सुधारून वाढवलेली नवीन आवृत्ति प्रसिद्ध केली आहे ती माझ्या वाचनात आली. नवीन आवृत्ति काढण्याचे कारणहि खास आहे. ते पुढे कळेलच.

Chapter ListNext »