Bookstruck

महत्वपूर्ण घटनाक्रम

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


वनवासाच्या दरम्यान राम कुठे कुठे राहिला? : रामायणात उल्लेख असल्या प्रमाणे आणि अनेक संशोधाकांनुसार जेव्हा भगवान रामाला वनवास झाला, तेव्हा त्याने आपला प्रवास अयोध्येपासून सुरु करून नंतर रामेश्वरम आणि शेवटी श्रीलंका इथे समाप्त केला. या दरम्यान त्याच्यासोबत जिथे जिथे जे जे काही घडले, त्यांच्यापैकी २०० पेक्षा अधिक घटनास्थळांची ओळख पटलेली आहे.
प्रख्यात इतिहासकार आणि पुरातत्त्ववादी संशोधक डॉ. राम अवतार यांनी सीता आणि रामाच्या जीवनातील घटनांशी निगडीत अशा २०० पेक्षा देखील अधिक स्थानांचा शोध लावला आहे, जिथे आज देखील त्यासंबंधी स्मारक विद्यमान आहे, जिथे श्रीराम आणि सीता थांबले होते. तेथील स्मारके, भित्तीचित्र, गुहा, इत्यादी स्थानांच्या काळाचा पडताळा वैज्ञानिक पद्धतीने करण्यात आला.

« PreviousChapter ListNext »