Bookstruck

ओक आइलंड चा खड्डा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
१७९५ मध्ये ओक आयलंड मध्ये काही मुलांना नोवा स्कोटीया जवळ एका छोट्याशा द्वीपावर काही रहस्यमय प्रकाश दिसला. जेव्हा मुलं तिथे गेली तेव्हा त्यांना तिथे एक खूप मोठा ताजा खणलेला खड्डा दिसला आणि मुलांनी जेव्हा तिथे आणखी खोदकाम केले तेव्हा आत त्या खड्ड्यात त्यांना नारळाच्या करवंट्या, लाकूड आणि एक दगडाचा तुकडा मिळाला. दगडाच्या तुकड्यावर लिहिले होते की चाळीस फूट खाली २ मिलियन पाउंड पुरलेले आहेत. या खजिन्याचा पुढे अनेक लोकांनी शोध घेतला. खुद्द अमेरिकन राष्ट्रपती डेलानो रुझवेल्ट यांनी हा खजिना शोधण्याचा प्रयत्न केला. अर्थात तेव्हा ते अमेरिकेचे राष्ट्रपती नव्हते. परंतु अजूनपर्यंत तो खजिना कोणालाही मिळालेला नाही.
« PreviousChapter ListNext »