चंद्रशेखर सिंह
![]()
चंद्रशेखर सिंह भारताचे नववे पंतप्रधान होते. त्यांचा जन्म १९२७ मध्ये पूर्व उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यात इब्राहीमपट्टी इथल्या एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे शालेय शिक्षण भीमपुरा च्या राम करन इंटर कॉलेज मध्ये झाले. त्यांनी इलाहाबाद विश्वविद्यालयातून एम्.ए. डिग्री घेतली. त्यांना विद्यार्थी राजनीतीमध्ये एक "फायरब्रांड" या नावाने ओळखले जायचे. विद्यार्थी दशेनंतर ते समाजवादी राजनीतीमध्ये सक्रीय झाले. त्यांनी पूर्व नेते व्ही पी सिंह यांच्या राजीनाम्यानंतर जनता दलातील काही नेत्यांना घेऊन समाजवादी जनता पार्टीची स्थापना केली. त्यांच्या सरकारला भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस ने निवडणूक न करण्यासाठी समर्थन केल्यानंतर त्यांचे छोट्या बहुमताचे सरकार बनले. राजीव गांधींच्या बाबतीतील आरोप झाल्यानंतर त्यांचे कॉंग्रेसशी असलीले संबंध बदलले. कॉंग्रेसने त्यांच्या सरकारला सहयोग नाकारल्यानंतर त्यांनी ६० खासदारांच्या समर्थनाने राजीनाम्याची घोषणा केली.
पंतप्रधान पदावर केवळ ७ महिने राहिलेल्या चंद्रशेखर यांनी ६ मार्च १९९१ ला राजीनामा दिला. परंतु राष्ट्रीय निवडणुकांपर्यंत त्यांनी पंतप्रधानपद सांभाळले. आपल्या संसदेतील भाषणांसाठी ते अतिशय चर्चित होते. १९९५ मध्ये त्यांना आउटस्टैण्डिंग पार्लिमेन्टेरियन पुरस्कार देखील मिळाला होता.