Bookstruck

पुंसवन संस्कार

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
गर्भ राहिल्यानंतर भावी मातेचा आहार, आचार - विचार, व्यवहार, चिंतन - मनन, भाव या सर्वांना उत्तम आणि संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. हिंदू धर्मामध्ये, संस्कार परंपरेच्या अंतर्गत भावी माता-पित्यांना ही तथ्य समजावून दिली जातात की शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या परिपक्व झाल्यानंतर, समाजाला श्रेष्ठ आणि तेजस्वी अशी नवीन पिढी देण्याच्या संकल्पासोबतच संतानाला जन्म देण्याचा प्रपंच करावा. त्याकरिता अनुकूल असे वातावरण देखील निर्माण केले जाते. गर्भाच्या तिसऱ्या महिन्यात विधिवत पुंसवन संस्कार संपन्न करण्यात येतो, कारण या वेळेपर्यंत गर्भातील बाळाच्या विचार तंत्राचा विकास सुरु होत असतो. वेद मंत्र, यज्ञाचे वातावरण आणि संस्कार सूत्र यांच्या प्रेरणेमुळे बाळाच्या मनावर श्रेष्ठ असा प्रभाव तर पडतोच, परंतु भाविक आणि परिजन यांना देखील प्रेरणा मिळते की भावी मातेसाठी श्रेष्ठ मनःस्थिती आणि परिस्थिती कशी विकसित केली जाऊ शकते.

क्रिया आणि भावना
गर्भ पूजनासाठी गर्भार महिलेच्या परिवारातील सर्व वयस्क आणि परिजनांच्या हातात अक्षता, फुले देण्यात यावीत. मंत्र म्हणावेत. मंत्र समाप्त झाल्यानंतर एका बशीत एकत्र करून गर्भार महिलेला देण्यात यावे. तिने त्याचा पोटाला स्पर्श करावा आणि ठेवून द्यावे. यावेळी अशी भावना करावी की गर्भातील बाळाला सद्भाव आणि अनुग्रहाचा लाभ देण्यासाठी हे पूजन करण्यात येत आहे. गर्भार महिला त्याचा स्वीकार करून गर्भाला त्याचा लाभ होण्यात सहयोग करत आहे.

ॐ सुपर्णोऽसि गरुत्माँस्त्रिवृत्ते शिरो, गायत्रं चक्षुबरृहद्रथन्तरे पक्षौ । स्तोमऽआत्मा छन्दा स्यङ्गानि यजूषि नाम । साम ते तनूर्वामदेव्यं, यज्ञायज्ञियं पुच्छं धिष्ण्याः शफाः । सुपर्णोऽसि गरुत्मान् दिवं गच्छ स्वःपत॥
« PreviousChapter ListNext »