Bookstruck

समावर्तन संस्कार

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
गुरुकुलातून निरोप देण्याच्या आधी शिष्याचा समावर्तन संस्कार होत असे. या संस्काराच्या आधी शिष्याचा केशान्त संस्कार होत असे आणि मग त्याला स्नान घालण्यात येत असे. हे स्नान समावर्तन संस्काराच्या अंतर्गत होत असे. यामध्ये सुगंधी पदार्थ आणि औषधीयुक्त पाण्याने भरलेले वेदीच्या उत्तर भागात आठ घटांच्या पाण्याने स्नान करण्याचे विधान आहे. हे स्नान विशेष मंत्रांच्या उच्चारासोबत होत असे. यानंतर शिष्य पट्टा (मेखला) आणि दंड सोडून देत असे जे यज्ञोपवितासोबत धारण केलेले असत. या संस्कारानंतर त्याला आचार्य विद्या स्नातकाची पदवी देत असत. या उपाधी बरोबर तो सगर्व गृहस्थाश्रमात प्रवेश करण्यासाठी योग्य समाजाला जात असे. यावेळी तो सुंदर वस्त्र आणि आभूषणे धारण करत असे आणि आचार्य आणि गुरुजनांचे आशीर्वाद घेऊन आपल्या घरी जाण्यासाठी निरोप घेत असे.

« PreviousChapter ListNext »