Bookstruck

अन्त्येष्टि संस्कार / श्राद्ध संस्कार

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List
हिंदू धर्मात कोणाचा मृत्यू झाल्यास त्याचे मृत शरीर वेदोक्त पद्धतीने चितेवर दहन करण्याची प्रक्रिया अंत्येष्ट विधी किंवा अंत्यसंस्कार म्हणून ओळखली जाते. हिंदू मान्यतेनुसार हा सोळा संस्कारातील एक संस्कार आहे.

हिंदू धर्मानुसार प्रत्येक शुभ कार्याच्या प्रारंभी माता - पिता,  पूर्वज यांना नमस्कार करणे आपले कर्तव्य आहे. आपल्या पूर्वजांच्या वंश परंपरेमुळे आज आपण हे जीवन बघू शकत आहोत. या जीवनाचा आनंद उपभोगत आहोत. या धर्मात ऋषींनी वर्षातील एका पंधरवड्याला पितृ पक्ष किंवा पितृ-पंधरवडा असे नाव दिले, ज्या पंधरवड्यात आपण आपल्या पितरांचे श्राद्ध, तर्पण, मुक्ती हेतूने विशेष क्रिया संपन्न करून त्यांना अर्घ्य देतो. जर काही कारणाने त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळाली नसेल तर आपण त्यांच्या शांतीसाठी विशिष्ट कर्म करतो.

धन्यवाद...!
« PreviousChapter List