Bookstruck

राममूर्ति नायडू

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

http://media.mensxp.com/media/content/2015/Sep/indian-hercules-social-1442831764.jpg

प्रोफेसर राममूर्ति नायडू भारताचे विश्वविख्यात पहिलवान होते ज्यांना त्यांच्या पराक्रमांमुळे ब्रिटीश सरकारने कलियुगातील भीम अशी उपमा दिली होती. दक्षिण भारतातील उत्तर आंध्र प्रदेशात जन्माला आलेल्या या महाबलीने एके काळी संपूर्ण विश्वात खळबळ माजवली होती. स्वतः ब्रिटीश सम्राट पाचवा जॉर्ज आणि राणी मेरी यांनी त्यांना लंडन येथील बकिंघम राजवाड्यात आमंत्रित केले आणि इंडियन हर्क्युलस आणि इंडियन सैण्डोज सारख्या उपाधी दिल्या. त्यांच्या शारीरिक बाळाच्या करामती पाहून सामान्य नागरिकांपासून ते शासक सर्व जण आश्चर्याने तोंडात बोटे घालत असत. त्यांनी विकसित केलेली व्यायामाची नवीन पद्धत आज देखील भारतीय मल्लयुद्ध क्षेत्रात प्रो.राममूर्ती यांची पद्धत म्हणून ओळखले जाते ज्यामध्ये दंड - बैठकांच्या दैनंदिन अभ्यासाने शरीराला अत्याधिक बलवान बनवले जाते.

« PreviousChapter ListNext »