Bookstruck

भूमिका

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »
ब्रम्ह अर्थात ईश्वरच मात्र सर्वोच्च आहे. देवी आणि देवता एका ब्रम्हाचे प्रतिनिधी आहेत. देवी आणि देवता ३३ प्रकारचे आहेत आणि या ३३ प्रकारच्या देवी देवतांचे हजारो गण आहेत ज्यांना देवगण म्हटले गेले आहे. प्रत्येक देवी आणि देवतेचे एक वाहन असते. अर्थात देवी देवतांना कुठेही जाण्या किंवा येण्यासाठी वाहनाची काहीच आवश्यकता नसते, परंतु यावरूनच हे लक्षात येईल की या वाहनांचे किती महत्व आहे. चला पाहूयात देवी देवतांच्या वाहनांची खरी गोष्ट. देवी देवतांनी आपल्या वाहनाच्या स्वरुपात काही पशू किंवा पक्षी निवडले आहेत, त्यामागे निश्चितच त्यांची विशिष्ट योग्यताच असणार. अर्थात आम्ही तुम्हाला हे देखील सांगू इच्छितो की आता यापैकी काही वाहने लुप्त होत चालली आहेत. अध्यात्मिक, वैज्ञानिक आणि व्यवहारिक कारणांनी भारतीय मानिशांनी देवाच्या वाहनाच्या रूपाशी पशु पक्षी जोडले आहेत. असे देखील मानले जाते की देवतांच्या सोबत पशूंना त्यांच्या व्यवहाराला अनुसरूनच जोडलेले आहे. जर पशूंना देवतांशी जोडले गेले नसते तर कदाचित पशूंच्या बाबतीत हिंसेचे प्रकार जास्त झाले असते. भारतीय मानिशींनी निसर्ग आणि त्यामध्ये राहणाऱ्या जीवांच्या रक्षणाचा एक संदेश दिला आहे. प्रत्येक प्राणी कोणत्या ना कोणत्या देवाचा प्रतिनिधी आहे. त्याचे वाहन आहे. म्हणूनच त्यांची हिंसा करता कामा नये.
Chapter ListNext »