Bookstruck

भगवान शंकराचे वाहन नंदी बैल

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

http://hindi.insistpost.com/wp-content/uploads/2015/04/Nandi-Aavtar.jpg

शिवाच्या एका गणाचे नाव नंदी आहे. प्राचीन काळातील ग्रंथ कामशास्त्र, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र आणि मोक्षशास्त्र पैकी कामशास्त्राचे रचनाकार नंदी होते.
विश्वातील जवळजवळ सर्व प्राचीन संस्कृती बैलाला महत्व देतात. सुमेरियन, बेबीलोनिया, असीरिया आणि सिंधू खोऱ्यातील उत्खननात देखील बैलाच्या मूर्ती मिळाल्या आहेत. त्याहूनही प्राचीन कालपासूनच बैलाला महत्व देण्यात आलेले आहे. भारतात बैल हा शेतीसाठी नांगराला जुंपण्यात येणारा एक महत्वपूर्ण प्राणी आहे.
ज्या प्रकारे गायींमध्ये कामधेनु श्रेष्ठ आहे त्याच प्रकारे बैलांमध्ये नंदी श्रेष्ठ आहे. सामान्यतः शांत राहणाऱ्या बैलाचे चरित्र उत्तम आणि समर्पण भाव असणारे सांगण्यात आले आहे. याच्या व्यतिरिक्त तो बल आणि शक्ती यांचे प्रतिक आहे. बैलाला मोह माया आणि भौतिक सुखांपासून अलिप्त राहणारा प्राणी देखील मानले जाते. हा साधा सज्जन प्राणी जेव्हा भडकतो तेव्हा तो सिंहाला देखील भिडतो. हीच सर्व करणे आहेत ज्यामुळे बैलाला भगवान शंकराने आपले वाहन म्हणून निवडले. शंकराचे चरित्र देखील बैलाप्रमाणेच मानले गेले आहे.
पौराणिक कथेनुसार शिलाद ऋषींनी शंकराची तपश्चर्या केल्यानंतर त्यांना पुत्र रुपात नंदी मिळाला होता. नंदीला त्यांनी वेदादी ज्ञानासह अन्य ज्ञान देखील प्रदान केले. एक दिवस शिलाद ऋषींच्या आश्रमात वरुण आणि मित्र नावाचे दोन दिव्य संत आले आणि पित्याच्या आज्ञेने नंदीने त्यांची भरपूर सेवा केली. जेव्हा ते निघाले तेव्हा त्यांनी ऋषींना तर दीर्घायुष्य आणि सुखशांती लाभण्याचा आशीर्वाद दिला परंतु नंदीला आशीर्वाद दिला नाही. तेव्हा शिलाद ऋषींनी त्यांना विचारले की त्यांनी नंदीला आशीर्वाद का नाही दिला?
तेव्हा संत म्हणाले की नंदी अल्पायुषी आहे. हे ऐकून शिलाद ऋषी चिंतेत पडले. पित्याची चिंता ओळखून नंदीने विचारले की काय झाले तेव्हा त्यांनी सांगितले की तू अल्पायुषी आहेस असे संत म्हणाले म्हणून चिंतेत आहे मी. हे ऐकून नंदी हसला आणि म्हणाला की भगवान शंकराच्या कृपेने मी तुम्हाला मिळालो आहे तेव्हा माझ्या प्राणांचे रक्षण देखील भगवान शंकरच करतील, तुम्ही कशाला नाहक चिंता करता आहात? एवढे बोलून नंदी भुवन नदीच्या किनारी भगवान शंकराची तपश्चर्या करण्यासाठी निघून गेला. कठोर तप केल्यावर भगवान शंकर प्रकट झाले आणि म्हणाले की वरदान माग वत्सा. तेव्हा नंदी म्हणाला की मी आजीवन तुमच्या सानिध्यात राहू इच्छितो.
नंदीच्या समर्पणाने प्रसन्न होऊन शंकराने त्याला मिठीत घेतले आणि त्याला बैलाचा चेहेरा देऊन त्याला आपले वाहन, आपला मित्र, आपल्या गणांत सर्वोत्तम म्हणून स्वीकार केला.


« PreviousChapter ListNext »