Bookstruck

सुग्रीव गुहा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

http://religious.jagranjunction.com/files/2015/10/sugriva-cave-4.jpg

सुग्रीव आपला भाऊ वाली याला घाबरून ज्या खंडरात राहत होता, तिला सुग्रीव गुहा या नावाने ओळखण्यात येते. ही ऋष्यमूक पर्वतावर होती. अशी मान्यता आहे की दक्षिण भारतात प्राचीन विजयनगर साम्राज्यातील विरुपाक्ष मंदिरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या एका पर्वताला ऋष्यमूक म्हटले जात असे आणि हाच रामायण काळातील ऋष्यमूक आहे. मंदिराच्या समीप सूर्य आणि सुग्रीव इत्यादींच्या मूर्ती स्थापित आहेत.
रामायणातील एका कहाणीनुसार वानरराज वालीने दुंदुभी नावाच्या एका राक्षसाला मारून त्याचे शरीर एक योजन दूर भिरकावून दिले होते. हवेतून उडत जाताना दुंदुभीच्या रक्ताचे काही थेंब मातंग ऋषींच्या आश्रमात पडले. ऋषींनी आपल्या तपोबलाने शोधून काढले की हा उद्योग कोणाचा आहे. क्रुद्ध ऋषींनी वालीला शाप दिला की जर तो कधीही ऋष्यमूक पर्वतापासून एक योजनाच्या क्षेत्रात आला तर त्याचा मृत्यू होईल. ही गोष्ट त्याचा छोटा भाऊ सुग्रीव याला माहित होती आणि याच कारणाने जेव्हा वालीने त्याला यातना देऊन आपल्या राज्यातून घालवून दिले तेव्हा तो याच पर्वतावर एका गुहेत आपल्या मंत्र्यांसहित राहू लागला. इथेच त्याची राम आणि लक्ष्मण यांच्याशी भेट झाली आणि रामाने वालीचा वध केला आणि सुग्रीवाला किश्किंधाचे राज्य मिळाले.

« PreviousChapter ListNext »