Bookstruck

युद्धाचे कारण

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

कृष्णापासून प्रद्युम्नचा आणि प्रद्यपम्न पासून अनिरूद्धाचा जन्म झाला होता. प्रद्युम्नचा मुलगा आणि कृष्णाचा नातू अनिरूद्ध याची पत्नी म्हणून उषा ओळखली जाते. अनिरुद्धची पत्नी उषा शोणितपुरचा राजा वाणासुराची
कन्या होती. अनिरुद्ध आणि उषा एकमेकांवर प्रेम करत  होते. उषाने अनिरुद्धचे हरण केले होते.  वाणासूराला अनिरूद्ध आणि उषा यांचे प्रेम अमान्य होते. त्याने  अनिरूद्धाला बंधक बलवून ठेवले. वाणासुराला शंकराचे वरदान मिळाले होते. शंकराला यासाठी श्रीकृष्णाशी युद्ध करावं लागलं होतं. शेवटी देवांच्या समजावण्यावरून हे युद्धा थांबले.प्रभू श्रीकृष्ण चौसष्ठ कलांमध्ये निपुण होते. ते सर्वश्रेष्ठ धनुर्धर तर होतेच पण ते द्वंद्वयुद्धात देखील प्रविण होते. याशिवाय त्यांच्याकडे अनेक शस्त्र आणि अस्त्र होती. त्यांच्या धनुष्याचं नावदेखील सारंग होतं. त्यांच्या तलवारीचं नाव नंदक, गदेचं नाव कौमौदकी, आणि शंखाचं नाव पांचजत्र्य होतं, तो गुलाबी रंगाचा होता. श्रीकृष्णाच्या एका रथाचं नाव जैत्र तर दुसऱ्याचं गरूढध्वज असं होतं. तदारूक हा त्यांचा सारथी होता आणि शैव्य, सुग्रीव, मेघपुष्प आणि बलाहक हे त्यांचे घोडे होते.

« PreviousChapter ListNext »