Bookstruck

भाग्य

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
लोक अशुभाला घाबरतात. कोणावर सावली आहे तर कोणावर भूतप्रेत. कोणावर कोणी काळी जादू केली आहे तर कोणाचे ग्रह खराब आहेत. कोणाचे भाग्य साथ देत नाही तर कोणी अपयशाने बेजार झालेला आहे. का? कारण जीवनात कोणताही संकल्प नाहीये. हवन कुंडाच्या समोर बसून त्याच्या अग्नीत आहुती देताना इदं न मम म्हणून एकदा आपली सर्व भली बुरी कर्म त्या ईश्वराला समर्पित करा. आपला जय पराजय त्या ईश्वराला वाहून टाका. एकदा त्या पवित्र अग्नीच्या समोर आपल्या संकल्पाची घोषणा करा. एकदा म्हणा की आता जयही त्याचा आणि पराजयही त्याचाच, मी तर माझे सर्वच त्याच्यावर सोपवले आहे. तुमच्या जय पराजयात नाही बदल घडून आला तर सांगा. प्रत्येक सकाळ होमाच्या अग्नीत इदं न मम म्हणून आपली कामे सुरु करा आणि मग तुम्हाला दुःख वाट्याला आले तर सांगा. ज्या घरात होमाचा अग्नी दर दिवशी प्रज्वलित होतो तिथे अशुभ, अपयश आणि पराजय यांचा अंधार कधीही टिकत नाही. ज्या घरात पवित्र अग्नी विराजमान असेल तिथे विनाश / अनिष्ट कधीही घडू शकत नाही.
« PreviousChapter ListNext »