Bookstruck

अश्वत्थामा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


खरच अश्वत्थामा आजही जिवंत आहे???
विज्ञान ही गोष्ट मान्य करत नाही की एखादी व्यक्ती हजारो वर्षे जिवंत राहू शकते. जास्तीत जास्त १५० वर्षे जिवंत राहू शकते ते देखील जर आरोग्य आणि खाणेपिणे उत्तम असेल तरच. तेव्हा हे कसे मान्य करता येईल की अश्वत्थामा जिवंत आहे?

http://i1.dainikbhaskar.in/thumbnail/655x588/web2images/www.dailybhaskar.com/2015/09/10/1_1441879399.jpg


का जिवंत आहे अश्वत्थामा??
महाभारताच्या युद्धात अश्वत्थामाने ब्रम्हास्त्र सोडले होते ज्यामुळे हजारो लोक मारले गेले होते. त्याच्या या कृत्याने अत्यंत चिडून कृष्णाने त्याला शाप दिला होता, की 'तू एवढ्या वधांचे पाप धुण्यासाठी ३ हजार वर्ष निर्जन स्थानी भटकत राहशील. तुझ्या शरीरातून सदैव रक्ताची दुर्गंधी येत राहील. तू अनेक रोगांनी ग्रासला जाशील.' व्यासांनी कृष्णाच्या म्हणण्याला दुजोरा दिला.    असे म्हणतात की या शापानंतर अश्वत्थामा वाळवंटी प्रदेशात निघून गेला आणि तिथेच राहू लागला होता. काही लोक म्हणतात की तो अरब देशांत निघून गेला होता. उत्तरप प्रदेशात मान्यता प्रचलित आहे की अरब देशांत जाऊन त्याने कृष्ण आणि पांडवांचा धर्म नष्ट करण्याची प्रतिज्ञा केली होती.

« PreviousChapter ListNext »