Bookstruck

महान योद्धा बर्बरीक

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

http://www.hindi.pardaphash.com/wp-content/uploads/2016/04/%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95.jpg

बर्बरीक महान पांडव भीमाचा पुत्र घटोत्कच आणि नागकन्या अहिलवती यांचा पुत्र होता. कुठे कुठे मूर दैत्याची कन्या ‘कामकंटकटा’ हिच्या गर्भातून देखील याचा जन्म झाल्याचे बोलले जाते. महाभारताचे युद्ध जेव्हा निश्चित झाले तेव्हा बर्बरिकने देखील युद्धात सामील होण्याची इच्छा प्रकट केली आणि मातेला हरणाऱ्या पक्षाची साथ करण्याचे वाचन दिले. तो आपल्या निळ्या रंगाच्या घोड्यावरून तीन बाण आणि धनुष्य घेऊन कुरुक्षेत्राच्या रणभूमीच्या दिशेने निघाला.
बर्बरीकसाठी केवळ ३ बाण पुरेसे होते ज्यांच्या सहाय्याने तो संपूर्ण कौरव आणि पांडवांची सेना समाप्त करू शकला असता. हे लक्षात घेऊन भगवान श्रीकृष्णाने ब्राम्हणाच्या वेशात त्याच्या समोर प्रकट होऊन कपटाने त्याच्याकडून दान म्हणून त्याचे शीर मागितले.
बर्बरीकने कृष्णाला विनंती केली की त्याला शेवटपर्यंत युद्ध पहायचे आहे, कृष्णाने त्याची ही विनंती मान्य केली. फाल्गुन महिन्याच्या द्वादशी रोजी त्याने आपले शीर दान केले. भगवंतानी त्याच्यावर अमृत शिंपडून सर्वांत उंच जागी ठेवले जेणेकरून त्याला पूर्ण महाभारत युद्ध पाहता येईल. त्याचे शीर युद्धभूमीच्या जवळच एका खडकावर ठेवण्यात आले जिथून बर्बरीक पूर्ण युद्धाची पाहणी करू शकत होता.

« PreviousChapter ListNext »