Bookstruck

बाराव्या दिवसाचे युद्ध

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
कालच्या युद्धात अर्जुनामुळे युधिष्ठिराला पकडता आले नाही त्यामुळे शकुनी आणि दुर्योधनाने अर्जुनाला युधिष्ठिरापासून जास्तीत जास्त लांब पाठवता यावे यासाठी त्रिगर्त देशाच्या राजाला त्याच्याशी युद्ध करून त्याला व्यस्त ठेवण्यासाठी पाठवले, त्याने तसे केले देखील, परंतु पुन्हा एकदा अर्जुन वेळेवर पोचला आणि द्रोण असफल राहिले.
झाले असे की जेव्हा त्रिगर्त अर्जुनाला दूर घेऊन गेले तेव्हा सात्यकी युधिष्ठिराचा रक्षक होता. परत आल्यावर अर्जुनाने प्राग्ज्योतिषपुर (ईशान्येचे एक राज्य) चा राजा भगदत्त याला अर्धचंद्राकृती बाणाने मारून टाकले. सात्यकीने द्रोणांच्या रथाचे चाक उडवले आणि त्यांचे घोडे मारले. द्रोणांनी अर्धचंद्र बाणाने सत्याकीचा शिरच्छेद केला.
सात्यकीने कौरवांच्या अनेक उच्च कोटीच्या योद्ध्यांना मारले ज्यामध्ये प्रमुख होते जलासंधी, त्रिगर्तांची गजसेना, सुदर्शन, म्लेन्छांची सेना, भूरिश्रवा, कर्णपुत्र प्रसन हे होते. युद्धभूमीवर सात्यकीला भूरिश्रवाकडून कडवी टक्कर झेलावी लागली. प्रत्येक वेळी सात्यकीला कृष्ण आणि अर्जुनाने वाचवले.
पांडव पक्षाचे नुकसान : द्रुपद
कौरव पक्षाचे नुकसान : त्रिगर्त नरेश
कोण मजबूत राहिले : दोनही पक्ष.
« PreviousChapter ListNext »