Bookstruck

अठराव्या दिवसाचे युद्ध

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
अठराव्या दिवशी कौरवांचे ३ योद्धे उरले होते - अश्वत्थामा, कृपाचार्य आणि कृतवर्मा. याच दिवशी अश्वत्थामाने पांडवांच्या वधाची प्रतिज्ञा केली. अश्वत्थामा आणि कृतवर्मा, कृपाचार्य यांनी रात्री पांडव शिबिरावर हल्ला केला. अश्वत्थामाने सर्व पांचाल, द्रौपदीचे पाच पुत्र, धृष्टद्युम्न आणि शिखंडी इत्यादींचा वध केला.
द्रोण कपटाने मारले गेल्याचे ऐकून अश्वत्थामा दुःखी आणि क्रोधीत झाला आणि त्याने ब्रम्हास्त्राचा प्रयोग केला ज्यामुळे युद्धभूमी स्मशानभूमीत बदलली. हे पाहून कृष्णाने त्याला कलियुगाच्या अंतापर्यंत रोगी अवस्थेत जिवंत भटकत राहण्याचा शाप दिला.
या दिवशी भीमाने दुर्योधनाच्या उरलेल्या भावांना मारून टाकले, सहदेवाने शकुनीला मारले आणि आपला पराजय ओळखून दुर्योधन पळून जाऊन सरोवराच्या स्तंभात जाऊन लपला. याच दरम्यान बलराम तीर्थयात्रेवरून परत आले. त्यांनी दुर्योधनाला निर्भय राहण्याचा आशीर्वाद दिला.
लपून बसलेल्या दुर्योधनाला पांडवानी ललकारल्यावर त्याने भिमाशी गदायुद्ध केले आणि जान्घेवर प्रहर झाल्याने त्याचा मृत्यू झाला. अशा प्रकारे पांडव विजयी झाले.
पांडव पक्षाचे नुकसान : द्रौपदीचे ५ पुत्र, धृष्टद्युम्न, शिखंडी.
कौरव पक्षाचे नुकसान : दुर्योधन.

« PreviousChapter ListNext »