Bookstruck

मारीच

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

https://s-media-cache-ak0.pinimg.com/736x/50/5d/2b/505d2bb336fb29e107f79fc2920deb05.jpg

रामाच्या बाणातून बचावल्यानंतर ताडका पुत्र मारीच रावणाला शरण गेला. मारीच हा लंकापती रावणाचा मामा होता. जेव्हा शूर्पणखाने रावणाला आपल्या अपमानाची कथा सांगितली तेव्हा रावणाने सीता अपहरणाची योजना आखली. त्यासाठी त्याने मारीचच्या मायावी बुद्धीची मदत घेतली. रावण महासागर पार करून गोकर्ण तीर्थाला पोचला, जिथे रामाच्या भीतीने मारीच लपून बसला होता. तो रावणाचा माजी मंत्री राहीला होता. रावणाला पाहून त्याने विचारले की राक्षसराज, असे काय घडले ज्यामुळे तुम्हाला माझ्याकडे यावे लागले? रावणाने क्रोधाने सांगितले की राम-लक्ष्मणाने शूर्पणखाचे नाक आणि कान कापले, आता आपल्याला त्यांचा बदला घ्यायचा आहे. मारीच म्हणाला, महाराज, रामाच्या जवळ जाऊन तुम्हाला काहीही लाभ होणार नाही. त्यांचा पराक्रम मला माहिती आहे. या जगात असा कोणीही नाही जो त्यांच्या बाणांचा वेग सहन करू शकेल. रावण यावर क्रोधीत झाला आणि म्हणाला, मामा, तू माझे ऐकले नाहीस तर मी तुला आत्ताच मारून टाकीन हे निश्चित. मारीचाने मनात विचार केला, जर मरण निश्चित आहे तर श्रेष्ठ पुरुषाच्या हातून मारावे हेच उत्तम. मग तो म्हणाला, मला काय करावे लागेत ते सांगा. रावण म्हणाला - तू एका सुंदर हरणाचे रूप घे ज्याची शिंगे रत्नासारखी भासली पाहिजेत. शरीरावर देखील चित्र विचित्र रत्न दिसली पाहिजेत. असे रूप घे ज्यामुळे सीता मोहात पडली पाहिजे. जर ती मोहात पडली तर रामाला तुला पकडायला पाठवेल. या दरम्यान मी तिला पळवून घेऊन जाईन. मारीचाने रावणाने सांगितल्याप्रमाणेच केले आणि रावण आपल्या योजनेत सफल झाला. इकडे रामाच्या बाणाने मारीच मारला गेला.

« PreviousChapter ListNext »