Bookstruck

महिषासुर

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
असुर सम्राट रंभ आणि त्याचा भाऊ करंभ यांनी अग्नी आणि वरुण देवाला प्रसन्न करून त्यांच्याकडून वरदान प्राप्त केले होते. जिथे अग्नीदेवाला प्रसन्न करण्यासाठी रंभने आगीच्या ज्वालांमध्ये बसून कठोर तपश्चर्या केली, तिथे करंभने पाण्यात राहून वरुण देवाची तपश्चर्या केली होती. शेवटी इंद्रदेवाने मगरीचे रूप घेऊन करंभचा वध केला होता आणि नंतर इंद्राच्या वज्राच्या वाराने रंभचा मृत्यू झाला होता. पाण्यात राहणारी म्हैस आणि असुर सम्राट रंभ यांची संतान महिषासुर याने देखील घोर तपश्चर्या केली.
रम्भासुराचा पुत्र होता महिषासुर, जो अत्यंत शक्तिशाली होता. त्याने अमर होण्याच्या इच्छेने ब्रम्हदेवाला प्रसन्न करण्यासाठी कठीण तपश्चर्या केली. ब्रम्हदेव त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न झाले. ते हंसावर बसून महिषासुराच्या जवळ आले आणि म्हणाले. 'वत्सा... उठ, आणि इच्छेनुसार वर माग.' महिषासुराने त्यांच्याकडून अमर होण्याचे वरदान मागितले.
ब्रम्हदेव म्हणाले, 'एक मृत्यू सोडून, काहीही इच्छा कर, मी तुला देऊ शकतो, कारण जन्माला आलेल्या प्राण्याचा मृत्यू निश्चित आहे.'
महिषासुराने खूप विचार केला आणि म्हणाला, 'ठीक आहे प्रभू, देवता, असुर आणि मानव कोणाकडूनही मला मृत्यू येऊ नये. एखाद्या स्त्रीच्या हस्ते माझा मृत्यू निश्चित करण्याची कृपा करा.' ब्रम्हदेव ' एवमस्तु एव ' म्हणून आपल्या लोकात निघून गेले.

वर प्राप्त करून परत आल्यानंतर महिषासुर समस्त दैत्यांचा राजा बनला. त्याने दैत्यांची विशाल सेना एकत्र केली आणि पाताळ आणि मृत्युलोकावर आक्रमण करून सर्व आपल्या कबजात घेतले. मग त्याने देवतांच्या इंद्रलोकावर आक्रमण केले. या युद्धात भगवान विष्णू आणि शंकराने देखील देवतांची सोबत केली परंतु महिषासुराच्या हस्ते सर्वांना पराजयाचा सामना करावा लागला आणि देवलोकावर देखील महिषासुराचे आधिपत्य आले.
भगवान विष्णूने सर्व देवतांसोबत मिळून भगवती महाशक्तीची आराधना केली. सर्व देवतांच्या शरीरातून एक दिव्य तेज निघाले आणि एका परम सुंदरीच्या रुपात प्रकट झाले. हिमवानाने भगवतीला सवारीसाठी सिंह दिला आणि सर्व देवतांनी आपापली अस्त्र - शस्त्र महामायेच्या सेवेला प्रस्तुत केली. भगवतीने देवतांवर प्रसन्न होऊन त्यांना लवकरच महिषासुराच्या भयापासून मुक्ती देण्याचे आश्वासन दिले. भगवती दुर्गा हिमालयावर पोचली आणि तिने अट्टाहासपूर्वक घोर गर्जना केली. महिषासुराच्या असुरांसोबत तिचे घनघोर युद्ध सुरु झाले. एक एक करून महिषासुराचे सर्व सेनानी मारले गेले. मग नाईलाज होऊन महिषासुराला देखील देवीशी युद्ध करावे लागले. महिषासुराने अनेक प्रकारची मायावी रपे घेऊन देवीला कपटाने मारण्याचा प्रयत्न केला परंतु शेवटी देवीने आपल्या चक्राने महिषासुराचे मस्तक छाटले.
« PreviousChapter ListNext »