Bookstruck

दानवराज विप्रचिति

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List
ब्रम्हदेवाने याला देखील वरदान दिले होते. दानवराज विप्रचिति किंवा विप्रजिति हा कश्यप आणि दनु यांच्या १०० पुत्रांपैकी प्रमुख होता. महाभारतात दनुच्या पुत्रांची संख्या ३४ सांगण्यात आली आहे ज्यामध्ये याला प्रमुख मानले गेले आहे. त्याच्या भावांमध्ये ध्वज नावाचा दानव प्रमुख होता. वृत्तासुर आणि इंद्र यांच्यात झालेल्या युद्धात हा असुर पक्षाच्या सोबत होता. बली, विरोचन आणि इंद्र यांच्या युद्धात देखील हा सामील होता. वामनाकडून बलीबंधनाच्या वेळी देखील हा युद्ध करण्यासाठी तयार झाला होता. अमृत मंथनाच्या (मत्स्य २४५.३१) वेळी देखील हा उपस्थित होता.
आपल्या सिंहिका नावाच्या पत्नीपासून याला १०१ पुत्र झाले होते, जे सैहीकेय नावाने प्रसिद्ध झाले. राहू आणि केतू देखील याचेच पुत्र होते. ते सर्व सैहीकेय राक्षस बनले होते. भागवताच्या व्यतिरिक्त मत्स्य, ब्रह्म इत्यादी पुराणांमध्ये याच्या पुत्रांची संख्या १३ सांगितलेली आहे. हरिवंश, विष्णू आणि ब्रम्हांड मध्ये १२ सांगितलेली आहे.
« PreviousChapter List