Bookstruck

सिकंदर आणि पोरस युद्ध (326 ई.स.पू.)

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

http://www.dolphinpost.com/wp-content/uploads/2015/08/634a6c85feae4f2fcfc3a95caed34fd7.jpg

तसे पाहिले तर भारतावर नेहमीच लहान मोठी आक्रमणे होत राहिली आहेत, पण पहिले मोठे आक्रमण सिकंदरनेचकेले होते. सिकंदर आणि पोरस यांच्यात झालेल्या युद्धात पोरसचा विजय झाला होता. सिकंदरने भारताच्या पश्चिमेला असलेल्या पोरस च्या राज्यावर आक्रमण केले होते. पोरसच्या राज्याच्या आजूबाजूला २ छोटी राज्य होती - तक्षशिला आणि अम्भिसार. तक्षशिला, जिथला राजा अम्भी होता आणि अम्भिसार चे राज्य काश्मीरच्या चारही बाजूला पसरलेले होते.
अम्भी चे पुरू बरोबर जुने वैर होते त्यामुळे त्याने सिकंदरशी हातमिळवणी केली. अम्भिसारने तटस्थ राहून सिकंदर चा मार्ग सुकर केला. दुसरीकडे धनानंद चे राज्य होते ते देखील तटस्थ होते. अशा परिस्थितीत पोरसला एकट्यालाच लढावे लागले.
या युद्धानंतर भारताचा पश्चिम भाग कमजोर होऊ लागला. यवनांची आक्रमणे वाढू लागली. संपूर्ण अफगाणिस्तान त्या काळात भारताचा पश्चिम भाग होता जिथे उपगणस्थान, गांधार आणि केकय प्रदेश होते आणि ते सर्व बौद्ध राष्ट्र बनलेले होते. हीच परिस्थिती भारताच्या पूर्व सीमेवर झाली, जिथे तिबेट (त्रिविष्टप), ब्रह्मदेश (बर्मा), श्यामदेश (थाईलैंड, इंडोनेशिया, मलेशिया), जावा आणि सुमात्रा होते, परंतु पश्चिमेच्या तुलनेत ही सर्व क्षेत्र शांत होती. बौद्ध धर्माच्या उदयानंतर  अखंड भारताचे बहुतेक हिस्से बौद्ध वर्चस्व वाले बनू लागले. अहिंसा आणि लोकतांत्र इथल्या शासनाची प्रमुख अंगे होती.

« PreviousChapter ListNext »