Bookstruck

हनुमानाची भक्ती

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

http://s3.india.com/wp-content/uploads/2015/12/battle-between-shri-ram-and-hanuman-567a66ee2a6eb_g.jpg

राम परत आल्याच्या आनंदात ठिकठिकाणी समारोह, सोहळे होत होते. रामाच्या भक्तांमध्ये कामांची वाटणी चालली होती. कोणाला सजावटीचे तर कोणाला दिव्यांच्या सजावटीचे काम देण्यात आले होते. काही लोप्कांना भोजन आणि निरनिराळी पक्वान्न बनवण्याची जबाबदारी दिलेली होती तर काही लोकांना आगत-स्वागताची जबाबदारी सोपवण्यात आली होती. अशा प्रकारे सर्व कामे भक्तांमध्ये वाटून घेण्यात आली होती.
त्याच वेळी हनुमान तिथे पोचले. ते रामाच्या समोर हात जोडून उभे राहिले आणि म्हणाले, "प्रभू, मला देखील काही काम सांगावे. मी तर तुमचा परम भक्त आहे." राम थोडा विचारात पडले कारण सर्व कामांची वाटणी तर आधीच झालेली होती. आता जर एखाद्या भाज्ताकडून काम काढून घेऊन हनुमानाला दिले तरी ते योग्य वाटले नसते. श्रीराम चांगलेच विचारात पडले. एकेकी श्रीरामाला जांभई आली आणि त्यांनी टिचकी वाजवून सुस्ती झटकली आणि टिचकीबरोबरच त्यांच्या मनात एक विचार आला. त्यांनी हनुमानाला सांगितले, "तुझे कार्य हे आहे की जेव्हा मला जांभई येईल, तेव्हा तू टिचकी वाजवायची." हनुमानाने हात जोडून हे कार्य स्वीकारले. प्रभूंनी एकदा पुन्हा जांभई दिली आणि हनुमानाने लगेचच टिचकी वाजवली.
काही वेळानंतर श्रीराम आराम करण्यासाठी आपल्या क्स्क्षात गेले आणि हनुमानजी जागृत होऊन त्यांच्या द्वारावर बसून राहिले. त्याच वेळी हनुमानाच्या मनात विचर आला की जर त्याच्या स्वामींना जांभई आली तर आपण टिचकी वाजवण्यापासून वंचित राहू आणि आपल्या कर्तव्याला मुकू. त्यामुळे त्यांनी सतत टिचक्या वाजवायला सुरुवात केली. त्याच वेळी रामाच्या मनात देखील हनुमानाच्या स्वमिभाक्तीचा विचार आला आणि त्यांना समजले की हनुमान सतत टिचक्या वाजवत असेल. रामाने जांभई मागून जांभई द्यायला सुरुवात केली जेणेकरून हनुमानाची टिचकी व्यर्थ जाऊ नये. तिकडे हनुमानजी टिचकी मागून टिचकी वाजवत राहिले जेणेकरून रामाची एकही जांभई टिचकी पासून वंचित राहू नये. हे रात्रभर चालू राहिले.
यावर सीता हैराण झाली की रामाला हे काय झाले आहे. ना काही बोलत ना सांगत, आपली जांभईवर जांभई देत आहेत! सकाळ होताच सीतेने लक्ष्मणाला राजवैद्यांना बोलवायला पाठवले. लक्ष्मणासाठी दरवाजा उघडताच रामाने जांभई देणे बंद केले आणि आणि हनुमानाने टिचकी वाजवणे बंद केले.
आता सीता आणि लक्ष्मण दोघेही हैराण झाले, तेव्हा रामाने त्यांना संपूर्ण हकीगत सांगितली आणि हनुमानाच्या स्वमिभक्तीची तोंडभरून प्रशंसा केली. नंतर रामाने हनुमानाकडून टिचकी वाजवण्याचे कठीण काम काढून घेतले आणि त्याला स्वगत करण्याच्या कामावर नेमले.
लोक आजही हनुमानाच्या रामभक्तीची आठवण ठेऊन आहेत. आणि जांभई अल्यावत टिचकी वाजवण्याची परंपरा तर आजही कायम आहे. कदाचित या परंपरेची सुरुवात तिथूनच झाली असेल.

« PreviousChapter ListNext »