Bookstruck

अशी आहेत हनुमानाची ५ चमत्कारिक मुखे

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

http://www.hdwallpaperseek.com/coder/upload1920x1200/Panchmukhi-Hanuman-t1-1920X1200.jpg

श्री हनुमानाला रुद्राचा अवतार मानले जाते. आशुतोष म्हणजे भगवान शंकराचा अवतार असल्या कारणाने हनुमान थोड्या भक्तीने प्रसन्न होऊन लवकरच कलह, दुःख आणि पिडा दूर करून मनाप्रमाणे फळ देणारे मानले जातात. श्री हनुमान चरित्र गुण, शील, शक्ति, बुद्धि कर्म, समर्पण, भक्ति, निष्ठा, कर्तव्य अशा आदर्शांनी भरलेले आहे. या गुणांमुळेच भक्तांच्या मनात त्यांच्याविषयी खोलवर धार्मिक आस्था जडलेली आहे, जी हनुमानाला सर्वांत लोकप्रिय देवता बनवते.
श्री हनुमानाची साधना अनेक रूपांत केली जाते. लोक परंपरेत बाल हनुमान, भक्त हनुमान, वीर हनुमान, दास हनुमान, योगी हनुमान इत्यादी प्रसिद्ध आहेत. परंतु शास्त्रांमध्ये श्री हनुमानाच्या एका चमत्कारिक रूप आणि चरित्राबद्दल लिहिलेले आहे. ते म्हणजे पंचमुखी हनुमान.
धर्मग्रंथांमध्ये अनेक देवी-देवता एकापेक्षा जास्त मुखे असलेले सांगण्यात आले आहेत. परंतु पाच मुखे असलेल्या हनुमानाची भक्ती केवळ लौकिक मान्यतेने नाही तर धार्मिक आणि तंत्र शास्त्रांमध्ये देखील अतिशय चमत्कारिक फलदायी मानली गेली आहे. पाहूयात पंचमुखी हनुमानाचे स्वरूप आणि त्यापासून मिळणाऱ्या शुभ फळांविषयी -
पौराणिक कथेनुसार एकदा पाच मुखे असलेल्या एका दैत्याने तप करून ब्रम्हदेवाकडून असा वर प्राप्त केला की त्याला त्याच्या सारख्या कडूनच मृत्यू येवो, अन्य कोणाहीकडून नाही. वर प्राप्त झाल्यानंतर त्याने जगाला अत्यंत पिडा द्यायला सुरुवात केली. तेव्हा देवतांच्या विनंतीवरून हनुमानाने पाच मुखे असलेला अवतार घेऊन त्या दैत्याचा अंत केला.
हनुमानाची पाच मुखे पाच दिशांना आहेत. प्रत्येक रूप एक मुख असलेले, त्रिनेत्रधरी म्हणजे तीन डोळे असलेले आणि दोन हात असलेले आहे. ही पाच मुखे नर्सिंग, गरुड, अश्व, वानर आणि वरः अशी आहेत.
पूर्व दिशेला वानर मुख आहे जे अत्यंत तेजस्वी आहे. ज्याच्या उपासनेने विरोधी आणि शत्रू यांचा पराजय होतो.
पश्चिम दिशेला गरुड मुख आहे, ज्याचे दर्शन आणि भक्ती संकट आणि अडचणी यांचा नाश करते.
उत्तर दिशेला वरः मुख आहे, ज्याची सेवा - साधना केल्याने अपर धनदौलत, ऐश्वर्य, यश, दीर्घायू आणि आरोग्य प्राप्त होते.
दक्षिणेला भगवान नरसिंहाचे मुख आहे, ज्या रूपाच्या भक्तीने जीवनातून प्रत्येक चिंता, त्रास आणि भीती दूर होते.
पाचवे मुख आकाशाच्या दिशेला दृष्टी असणारे आहे, हे रूप अश्व म्हणजे घोड्यासारखे असते. हे श्री हनुमानाचे करुणामय रूप आहे, प्रत्येक संकटात ते भक्ताचे रक्षण करते.
पंचमुखी हनुमानाच्या साधनेने जाणता अजाणता झालेल्या वाईट कर्मांपासून आणि विचारांच्या दोषांपासून मुक्ती मिळते. तिथेच धार्मिक स्वरूपाने ब्रम्हा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांची कृपा देखील प्राप्त होते. अशा प्रकारे श्री हनुमानाचे हे अद्भुत रूप शारीरिक, मानसिक, वैचारिक आणि आध्यात्मिक आनंद आणि सुख देणारे आहे.

« PreviousChapter ListNext »