Bookstruck

भूमिका

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »
भारत जगभरातील पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करून घेतो. इथली संस्कृती पूर्ण जगात प्रसिद्ध आहे. इथे शांती मिळवण्यासाठी सुद्धा पर्यटक येतात. इथे पर्यटनासाठी खूप सुंदर ठिकाणे आहेत. ही बाब गौरवपूर्ण आहे की भारत वेगाने विदेशी पर्यटकांचे आवडते ठिकाण म्हणून उभारून येऊ लागला आहे. दर वर्षी इथे जगाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येतात आणि इथल्या निसर्गसौंदर्याचा नि विविधतेचा आनंद लुटतात. कधी सणवार, तर कधी एखाद्या समारोहात येणारे पर्यटक इथल्या रंगत रंगून जातात. भारतातील लोकांचे आपलेपणाने वागणे देखील पर्यटकांना आकर्षित करते. आज आम्ही तुम्हाला भारतातील काही निवडक ऐतिहासिक स्थळांची माहिती देणार आहोत. इथे कुटुंब किंवा जोडीदारासोबत देखील भेट देता येऊ शकते. चला आम्ही तुम्हाला भारतातील १० सुंदर ठिकाणांची सफर करवून आणतो!

Chapter ListNext »