Bookstruck

पृथ्वीचे ऋतू बदलून जातील

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

http://3.bp.blogspot.com/-qSAHxpa7h5I/Tc_lWSGwxbI/AAAAAAAAIlY/Qr0bzDUvz-g/s1600/judgment_day.jpg

दुष्काळ आणि अत्याधिक कर यांच्यामुळे हैराण झालेले लोक पाने, मांस, मुळे, जंगली मध, फुले आणि बिया खाण्यावर येतील. भयंकर दुष्काळ पडेल. थंडी, हवा, उष्मा, पाऊस आणि बर्फ हे सगळे लोकांना खूप हैराण करतील.
महाभारतात कलियुगाच्या अंती प्रलय होणार असा उल्लेख आहे, परंतु तो कोणता जलप्रलय नसेल तर पृथ्वीवर सतत वाढत जाणाऱ्या उष्म्यामुळे असेल. महाभारताच्या वन पर्वात उल्लेख मिळतो की सूर्याचे तेज इतके वाढेल की सातही समुद्र आणि नद्या सुकून जातील. संवर्तक नावाचा अग्नी पृथ्वीला पाताळापर्यंत भस्म करून टाकेल. पाऊस पूर्णपणे बंद होईल. सर्व काही जळून जाईल, त्यानंतर मग १२ वर्षे सतत पाऊस पडेल ज्यामुळे सर्व धरती जलमय होऊन जाईल.

« PreviousChapter ListNext »