Bookstruck

नरसिंह भगवंतांची मूर्ती

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List
आता बद्रीनाथमध्ये देखील भगवंतांचे दर्शन होणार नाही, कारण मान्यतेनुसार जोशीमठ इथली भगवान नरसिंहाची मूर्ती दरवर्षी एक हात बारीक होत चालली आहे.
भविष्यवाणी : असे मानले जाते की ज्या दिवशी नर आणि नारायण पर्वत एकमेकांना मिळतील, बद्रीनाथचा मार्ग पूर्णपणे बंद होऊन जाईल. भक्तांना बद्रीनाथचे दर्शनही करता येणार नाही. पुराणांनुसार येत्या काही वर्षांमध्ये बद्रीनाथ आणि केदारेश्वर धाम लुप्त होऊन जातील आणि अनेक वर्षांनतर भविष्यात भविष्यबद्री नावाचे एक नवीन तीर्थ उदयाला येईल.
पुराणांमध्ये बद्री-केदारनाथ यांच्या रुसण्याचा उल्लेख आढळतो. पुराणांनुसार कलियुगाची ५००० वर्षे सरल्यानंतर पृथ्वीवर पापाचे साम्राज्य असेल. कलियुग आपल्या परमोच्च सीमेवर असेल तेव्हा लोकांची आस्था लोभ, लालसा आणि काम यांच्यावरच आधारित असेल. सच्च्या भक्तांची कमी असेल. ढोंगी संत धर्माची चुकीची व्याख्या करून समाजाला दिशाहीन करतील, तेव्हा याचा परिणाम असा होईल की धरतीवर मनुष्यांचे पापक्षालन करणारी गंगा पुन्हा स्वर्गाला निघून जाईल.

« PreviousChapter List