Bookstruck

२६ डिसेंबर क्वीन ऑफ द सी ट्रेन (२००० मृत्यू)

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »

२६ डिसेंबर २००४ रोजी सुमात्राच्या किनाऱ्यावर झालेल्या भूकंपामुळे आशिया आणि पूर्व आफ्रिका इथल्या किनारी प्रदेशांत सुनामी आली ज्यामध्ये २,२५,००० इतक्या मोठ्या संख्येने लोक मृत्युमुखी पडले. श्रीलंकेच्या पारलिया शहरात क्वीन ऑ द सी ट्रेन रुळावरून घसरली ज्यामध्ये २००० लोकांचा मृत्यू झाला. क्वीन ऑ द सी ट्रेन एक लोकप्रिय पर्यटक ट्रेन होती जी कोलंबो ते गल्ले प्रवास करत होती. २६ डिसेंबर २००४ रोजी नाताळच्या सुट्टीमुळे ट्रेन मधून १५०० पेक्षा जास्त पर्यटक प्रवास करत होते. सकाळी ९.३० वाजता पहिली लाट किनाऱ्यावर आदळली. त्याच्या प्रभावाने ट्रेन थांबली. स्थानिक लोकांना वाटले की ट्रेनच्या मागे लपले तर आपला बचाव होईल म्हणून ते ट्रेनच्या वर चढले. दुसऱ्या लाटेने इंजिन आणि ८ डब्यांना रुळावरून फेकले आणि ४ वेळा गरगर फिरून ती दलदलीत जाऊन थांबली.

प्रवाशांपैकी केवळ काही लोकच वाचले. पारलिया शहराचे अस्तित्वच नष्ट झाले आणि संपूर्ण कुटुंबेच्या कुटुंबे नष्ट झाली. श्रीलंकेत सुनामीने तब्बल ४१,००० लोकांचा बळी घेतला. क्वीन ऑ द सी ट्रेनचे तुटलेले डबे आजही श्रद्धांजली म्हणून जपून ठेवण्यात आलेले आहेत. आज त्या मार्गावर त्याच नावाची दुसरी ट्रेन धावते.

Chapter ListNext »