Bookstruck

२० ऑगस्ट १९९५ – फिरोजाबाद रेल्वे दुर्घटना (३५८ लोकांचा मृत्यू)

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

दिल्लीवरून निघालेली पुरुषोत्तम एक्स्प्रेस फिरोजाबाद जवळ थांबलेल्या कालिंदी एक्स्प्रेस वर जाऊन आदळली. या घटनेमध्ये जवळ जवळ ३५८ लोकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेला एक मानवी चूक किंवा गलथानपणा कारणीभूत ठरला. एका गायीशी धडक झाल्यामुळे कालिंदी एक्स्प्रेसचे ब्रेक अडकले होते आणि त्यामुळे ती रुळावर उभी होती. त्याच वेळेला पुरुषोत्तम एक्स्प्रेसला देखील त्याच रुळावरून जाण्याची आज्ञा देण्यात आली. पुरुषोत्तम एक्स्प्रेस कालिंदी एक्प्रेसवर मागून जाऊन आदळली ज्यामुळे ही भयानक दुर्घटना घडली.

« PreviousChapter ListNext »