Bookstruck

कविता - वैष्णवी पारसे

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
मन दारा कडे लागले होते
तुझ्या येण्याची वाट बघत होते
शेवटी आईच काळीज
मुलाच्या मागेच धावते
माझे डोळे तुझ्या वाटे कडे लागले होते
घडयालीच कांटा हळू हळू सरकत होता
पण माझे डोळे काही लागत नव्हते
ते सतत तुझ्या येण्याची वाट बघत होते
जशी जशी रात्र वाढत होती
जीवाची हुरहुर अजुन वाढत होती
कुठे असशील कसा असशील
काय करत असशील
या सगळया प्रशनानी
मनात गोंधळ मांडून ठेवला होता
पण त्याचा उत्तर मात्र माझ्या कडे नव्हता
हळू हळू रात्र सरली पहाट झाली तु आला
तेव्हाच माझ्या जीवात जीव आला
शेवटी आईच काळीज मुलाच्या मागेच धावते .
« PreviousChapter ListNext »