Bookstruck

कविता - सुरेश पुरोहित

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
तुझ्याचसाठी माझ्या घरी मी लावतोच पणत्या
लावूनी त्यांचे तेज मी बघतां,समाधन मनी या

दिपावलीच्या दिपांनी ये आगळाच साज
सर्व भुमीवर मंद मंदशा तेजाचे राज्य    
ते पाहुनीया सुख या मनी ये,दुःखच ना ऊरते
भरलेल्या कणगीतील दाणे,पाहुनी मन भारते

मज नच दिसती स्फुल्लिंगे ती आकाशा भारतां
श्रमिका भेटे शेतीत सोने,समाधान मनी या
चला चला हो पाहू त्यांच्या चेह-यावर आनंद
त्यानंतर मग गोडच सारे, मनांत ब्रम्हानंद
« PreviousChapter ListNext »