Bookstruck

कविता - संतोष बोंगाळे

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List
निळ्याशुभ्र आभाळात झाली सैरभैर  पाखरे
पाण्यासाठी दाही दिशा कसे आटले ओले झरे
ऊन, वारा वादळात झाडं देतात आसरा
स्वार्थापायी मानवाने नाळ तोडिली करकरा
तोच पावसासाठी देव पाण्यात कोंडतो
धरणीच्याच गर्भातून निसर्ग हा फुलतो
नदी, नाले कोरडे तहान काही भागेना
व्याकूळ जीव तरी तोड वृक्षांची थांबेना
झाडांच्याच संगतीत सुख मिळते माणसा
मातीत जाण्याआधी झाड लाव रे माणसा !
« PreviousChapter List