औषधोपचारात गडबडघाई
वैद्य छदाचारीकडे शरभाचारी नावाचा एक तरुण चिकित्साशास्त्र शिकायला आला होता. छदाचारी निरनिराळ्या रोगांबाबत, त्यांच्या लक्षणांबाबत व त्यावर करायच्या औषधोपचारांबाबत सांगत जाई आणि शरभाचारी ते भराभर एका वहीत टिपून ठेवी.
एकदा छदाचारी त्याला म्हणाला- "काही काही रोगांवर औषधच नसते. उदाहरण. म्हणजे-उचकीचा रोग. तो दूर करायचा म्हणजे एक गालफडातच मारायला हवी. कोणतंही औषध नाही त्यावर!"
इतकयात एका बग्गीतून उतरून एक लठ्ठ माणूस छदाचारीकडे आला आणि म्हणाला- "काल रात्रीपासून उचक्यांच्या त्रासामुळे..." आणि तो पुढे काही सांगणार, इतक्यात शिष्य शरभाचारी याने त्याच्या गालावर जोरात थप्पड मारून म्हटले- "हूं, आता तुमच्या उचक्या एकदम थांबून जातील पहा." आणि हे सांगितल्यावर त्याचा चेहरा खूप खुलला.
पण आपला गाल चोळत तो लठ्ठ माणूस म्हणाला- "अरे, उचक्या मला नाही, त्या बग्गीत बसलेल्या माझ्या मालकांना येत आहेत."
छदाचारी आता रागाने आपल्याकडे पाहत असल्याचे जाणून शरभाचारी म्हणाला- "हो! चिकित्सेत गडबडघाई कामाची नव्हे!"