निसर्गाचा खेळ
या वर्षी फार जास्त पाऊस पडल्यामुळे चहूकडे पाणीच पाणी झाले होते. कुठल्यातरी नदीच्या पुरात आसपासची सर्व गावे पाण्याखाली गेली होती. नायडूची जमीन नदीकिनाऱ्यालगत होती व त्याने खूप कष्ट करून पीक उभे केले होते. ते सगळे नष्ट झाले. मोठ्या मुश्किलीने नायडू आपल्या कुटुंबासह प्राण वाचवून सुरक्षित ठिकाणी पोहोचू शकला.
ही गोष्ट जेव्हा नायडूचा मित्र रायडू याला समजली तेव्हा तो शहरातून त्याला भेटायला आला व त्याने त्याचे सांत्वन केले. "नायडू, हा सगळा नशिबाचा खेळ आहे. जेव्हा लक्ष्मी येते तेव्हा नारळाच्या पाण्यासारखी येते, आणि जेव्हा जाते तेव्हा हत्तीने खाल्लेल्या बेलीप्रमाणे दिसेनाशी होते. नशीब एका हाताने देते आणि दुसऱ्या हाताने काढून घेते. यात नवीन ते काय आहे?"
दोन मिनिटे गप्प राहून नायडू उत्तरला, "तीस वर्ष मी दिवसरात्र मेहनत करून मिळवलेली सारी कमाई एका रात्रीत गमावली याचंच मला वाईट वाटते. तू ज्या नशिबाबद्दल बोलतो आहेस, त्यानेच मला ही मिळकत थोडी थोडी करत दिली होती. जर त्याने माझ्याकडून थोडी थोडी काढून घेतली असती तर मला इतके वाईट वाटले नसते. पण त्याने सर्व काही एका रात्रीत काढून घेतले! नाहीतर तुला सुद्धा माझी समजून घालण्याची वेळ पडली नसती, नाही का?" हे ऐकून रायडू गप्प बसला.