बुद्धिमान बुड्ढा
ग्रीस देशात एक बुड्ढा अन् त्याची बायको रहात असत. एके दिवशी बुड्ढा आपल्या बायकोला म्हणाला, "अग, मला पैशांची फार गरज आहे. तू बाजारात जाऊन आपली गाय विकून ये. मी स्वतःच गेलो असतो, पण माझा पाय मुरगळला आहे नं!"
म्हातारी बिचारी गाय हाकत हाकत बाजारात गेली. तीन चोर-ही तिच्या मागोमाग तिच्या नकळत बाजारात पोचले. बुद्धी गाय विकायला बाजाराकडे चाललीये हे त्यांनी ओळखले होते. आता गाय स्वस्तात खरेदीचा एक बेत त्यांनी योजला.
एक चोर बुद्धीला भेटून म्हणाला, "काय आजीबाई, बकरी विकायला निघालात वाटतं? केवढ्याला देणार?"
"आंधळा आहेस काय? समोर एवढी मोठी गाय असून तिला बकरी म्हणतोयस?" म्हातारीने रागावून विचारले. चोर डोके हलवत दु:खी आवाजात म्हणाला, "आजी, स्वप्न तर नाही दिसत तुम्हाला? ही बकरीच तर आहे. तीस रुपयांना देऊन टाका मला."
म्हातारीने हातातल्या छडीने त्याला एक वार मारले अन् ती पुढे गेली. जरा पुढे गेल्यावर तिला दुसरा चोर भेटला. त्याने विचारले, "कुठे चाललात आजी?"
"बाजारात चाललेय रे नातवा! हिला विकायला तुझ्या आज्यानं पाठवलंय मला!" म्हातारी उत्तरली.
"मी घेतो पंचवीस रुपयांना. देऊन टाक मला." तो दुसरा चोर म्हणाला.
"तुझं डोकं फिरलंय की काय? बुद्धी भ्रष्ट झालीय? ही चांगली धट्टी-कट्टी गाय बकरीच्या किमतीत विकू?" बुद्धीने विचारले. चोर आश्चर्य दाखवत म्हणाला, "एवढी मोठी झालीयस. दृष्टी कमी होत चाललीये तुझी! म्हणूनच बकरीला गाय म्हणते आहेस."
"जे असेल, ते असेल! तू आपला रस्ता पकड!" असे म्हणत म्हातारी पुढे निघाली, पण तिचे मन अशान्त होते. सगळेजण गायीला बकरी का म्हणत आहेत हे कळेना तिला!
विचार करत ती आणखी थोडी पुढे गेली, तोच तिसरा चोर तिच्या जवळ येऊन म्हणू लागला, "सासूबाई! विकणार आपली बकरी? वीस रुपयांना घ्यायला तयार आहे मी!"
"शेवटी ही बकरीच आहे तर! काहीतरी जादू झाली असावी असं वाटतंय! गाय घेऊन तर निघाले होते घरून!" म्हातारी पुटपुटत राहिली.
"सासू! काहीतरी झालंय बघ तुला. तुझ्या दृष्टीत, बुद्धीत काही दोष उत्पन्न झालाय. वीस रुपयांना देऊन टाक मला अन् घरी जाऊन हातपाय ताणून झोपून जा." तो तिसरा बोलला.
"एकांन तीस रुपये देऊ केले, तर दुसऱ्याने पंचवीसली मागितली. अन् आता काय विसात विकू? तीस दे आणि चालू लाग!" म्हातारी म्हणाली. "खरं तर बकरी तीसची नाहीच आहे. तरी घेतो मी ती! म्हातारी आहेस नं! तुला आणखी चालवायचं नाही; थकशील." तिसरा चोर बोलला.
बुद्धी आपली गाय तीस रुपयांना विकून घरी परतली. घडले सारे तिने नवऱ्याला सांगितले. चोरांचे वर्णन ऐकताच म्हात्याने ओळखले की, ते तिथे शेजारगावचेच सैतान आहेत. म्हातारीला तो म्हणाला, "घडलं ते घडलं. पुढे काय करायचं, ते मी पाहून घेतो."
बुड्ढा बाहेर गेला अन् एकसारखे दोन ससे खरेदी करून आला. एक ससा त्याने टोपलीत बंद करून घरात ठेवला अन् दुसरा आणखी एका टोपलीत बरोबर घेऊन आपल्या बायकोला म्हणाला, "ए धन्वू! आज आपल्याकडे पाहुणे येणार आहेत. मधातल्या चपात्या, खीर अन् गरम गरम बदकाचं मांस तयार ठेव. मी घरी परतल्यावर 'खाणं काय बनवलं आहे?' असं तुला विचारीन. तू सांग की, 'सशानं सांगितलं तसं बनवलंय सगळं!' असे सांगून तिला पुन्हा एकदा सर्व सांगून नीट उत्तर द्यायला बजावून तो निघून गेला.
शेजारगावी पोचता पोचता तीन्ही चोर दारूच्या अड्ड्यावर दारू पिऊन मजा करताना त्याला दिसले. बुड्ढ्याला पाहताच ते तिघे त्याला म्हणाले, "अरे बुड्ढ्या! तुझ्या बायकोला गाय अन् बकरीतला फरक ही कळत नाही." ते त्याची चेष्टा करू लागले.
"माझ्या बायकोबद्दलच बोलताय नं? तिची साठी बुद्धी नाठी झालीय. बुद्धी काम नाही करत तिची. पण म्हणून काय झालं? स्वयंपाक करण्यात तिची बरोबरी कोणीच नाही करू शकणार." बुड्ढा म्हणाला.
एक चोर म्हणाला, "बरं झालं, निदान एक काम तरी नीट येतंय तिला!"
म्हातारा मोठ्या विचारात पडल्याचे नाटक करत पुटपुटूला लागला, "आज काय बनवायला सांगू बरं? खीर खावीशी वाटतेय. बदकाचं गरम गरम मांस अन् मधातल्या चपात्याही हव्या." हे बोलता बोलता त्याने टोपलीतला ससा बाहेर काढला अन् म्हणाला, "अरे तू आत्ता लगेच घरी जा अन् आईला सांग की खीर, बदकाचं मांस अन् मधातल्या चपात्या तयार ठेव." इतके सांगून त्याने सशाला खाली सोडले. त्याने उड्या मारत कुठेसा सुंबाल्या केला!
"विचित्र ही वाटतंय सगळं! तू सांगितलेलं सगळं तो खरंच घरी जाऊन सांगेल का?" चोरांनी विचारले.
"का नाही सांगणार? अगदी एवढासा असल्यापासून पाळलाय मी तो! लहानपणापासूनच बोलायला शिकवलं मी त्याला. विश्वास नसेल, तर माझ्याबरोबर तुम्हीही चला माझ्या घरी जेवायला!" बुड्ढ्याने त्यांना आमन्त्रण दिले.
तिघेही म्हातऱ्याबरोबर त्याच्या घरी गेले. बुड्ढ्याने घरी पोचताच बायकोला विचारले, "झाला स्वयंपाक?"
"होऽ! सशानं सांगितलेलं सगळं बनवलंय मी." ती म्हणाला. तिने चौघांनाही जेवण वाढले. म्हातऱ्याने सशाला सांगितल्याप्रमाणे सारा स्वयंपाक तयार असलेला पाहून चोर फसले. तिघे थोडा वेळ आपसात कुजबुजत राहिले अन् शेवटी त्यांनी ससा विकत घेण्याची गोष्ट काढली.
"ससा विकू? छे, ते नाही होणार!" म्हातारा बोलला. चोर हजार रुपये द्यायला तयार झाले, तरीसुद्धा म्हातारा ढिम्मसुद्धा न बोलता बसून राहिला.
"ते इतका हट्ट करतायत, तर विकून टाका न ससा! पैशांची फार गरज आहे, असं म्हणत होता नं?" बुद्धीने आग्रह केला. चारी चोर एकमेकांकडे पाहात म्हणाले, "म्हातारबाबा, घाबरायचं काही कारण नाही." शेवटी म्हातऱ्याने हजार रुपये घेऊन टोपलीसह दुसरा ससा त्यांच्या हवाली केला.
आपल्या गावी परतताना चोर म्हणाला, "आत्या आधी याला आपण आपापल्या घरी पाठवूया. अन् आपल्या बायकांना आपल्या घरी काय स्वयंपाक तयार हवा, हे कळवू." त्यांनी एक एक करून सशाला आपली फर्माईश सांगितली अन् सोडून दिले. ससा वेगाने तेथून कुठेतरी पळून गेला.
नंतर तिघेही चोर आपापल्या घरी गेले. ससा आलाच नाही, आणि बुड्ढ्याने आपल्याला फसवले, हे कळायला त्यांना वेळ लागला नाही. तिघेही त्याच्या घरी जाऊन त्याला शिव्या देऊ लागले.
मोठ्या सहनशीलतेने त्यांच्या शिव्या ऐकल्यावर म्हातऱ्याने विचारले, "ससा सोडण्यापूर्वी तुम्ही त्याच्या अंगावरून हात फिरवलात की नाही?" त्यांनी तसे न केल्याचे कबूल केले. "बरोबरच आहे! सशाची मुठभर हवा होऊन गेली असली पाहिजे!"
"ससा काय हवेत बदलून जातो का कधी? वेड तर नाही लागलं म्हातऱ्या?" चोर रागाने बोलले.
"आँ? इतक्या मोठ्या गायीचं जर बकरीत रूपान्तर होतं, तर सशाचं हवेत का नाही होणार?" बुड्ढ्याने विचारले. म्हातऱ्याने आपला चांगलाच सूड घेतल्याचे चोरांनी ओळखले.