प्रसंग तो मी पाहिलेला

नेहमी प्रमाणे काल ती कॉल वर ती बोलून गेली
जणूकाही तिचं हृदय माझ्यापशी सोडून गेली

माहिती नव्हतं मला तू एवढी रागावशील
छोट्या छोट्या गोष्टीवर एवढी लांब जाऊन बसशील

एवढी लांब गेली की तुला वाटत नाही मिळाली परत येण्याची
का ग एवढ सार करताना तुला आठवण नाही आली आपल्या प्रेमाची

शब्द दिला होता तू मला सात जन्म माझी होण्याची
इच्छा कशी झाली ग तुझी अचानक शब्द मोडून जाण्याची
निरोप लागला होता मला तुझं असं अचानक सोडून जाण्याचा
प्रश्नच पडला होता मला माझं पुढचं जीवन जगण्याचा

सांगितलेले तुझे सारे शब्द कानात गुंजत होते
पावला पावलावर तुझे सारे शब्द आठवत होते

पहिलं होतं प्रीत तुझ मी दारावरून माझ्या जाताना
आपले सारे स्वप्न दिसत होते मला तुझ्या सोबत येताना.

प्रीत तुझं एक सारखं शांतपणाने जळत होतो.
मात्र तुझ्या त्या अग्नीमध्ये माझं सारं भविष्य जळताना दिसत होतं

प्रसंग तो मी पाहिलेला आज आठवतो मला.
तुझे सारे शब्द आठवतात मला प्रत्येक सणाला

लेखन रवींद्र नेतकर(तरवाडे)