Bookstruck

धडपडणारी मुले 128

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“वेणू ! ती व्याख्यानसुद्धा देशील,” रघुनाथ म्हणाला.

“स्वामींची पुष्कळ व्याख्याने ऐकली की मी सुद्धा देईन. सारे माझ्या लक्ष्यात राहते. परवांचा नवाकाळातील महात्मा गांधीचा लेख किती छान होता भाऊ. आणि तुझ्या स्वामींचे दैनिकाचे अंक आम्ही आणले आहेत आश्रमांत. मी सूत कातायला म्हणून जाते व दैनिकाचे वाचीत बसते. किती वाचले तरी पुरेसेच होत नाही,” वेणू म्हणाली.

“वाचीत जा वेणू. आणि लिहूनहि काढावे. अक्षर सुधरेल,” रघुनाथ म्हणाला.

“भिका म्हणत होता की, रोज गावात प्रभातफेरी काढावी,” वेणू म्हणाली.

“केंव्हापासून सुरू करणार आहेत? तुझा आवाज चांगला आहे. घे झेंडा खांद्यावर व सांग गाणी. जशी पंढरपूरची वारकरीण,” रघुनाझ म्हणाला.

“आपले आजोबा पंढरपूरला दरवर्षी जात असत. त्यांना सारे मान देत. होय ना ग आई?” वेणूने विचारले.

“होय तुम्हा पोरांवर त्यांचा किती लोभ, परंतु गेले सोढून,” आई म्हणाली.

“माल नेहमी खाऊ द्यायचे,” रघुनाथ म्हणाला.

“मी एक दिवस तुला खूप मारले. तर मामंजींनी वाघासारखी झडप घालून माझ्या हातांतून ओढून नेले. तो चेहरा मी कधी विसरणार नाही,” आई म्हणाली.

“भाऊ ! आपण उद्या काढू प्रभातफेरी. तू आहेस तोवर सुरु होऊ दे,” वेणू म्हणाली.

“आत रात्री प्रार्थनेच्यावेळी ठरवू ,” रघुनाथ म्हणाला.

शेवटी रात्री प्रार्थनेच्या वेळू ठरले की, सकाळची प्रार्थना झाली की गावात दररोज फेरी काढायची. गावांतील तरुणांस आनंद झाला. वेणूने शेजारच्य़ा मुलींना सांगितले. त्याही येणार होत्या.

पहाटेच्या वेळी राममंदिरांतून फेरी निघाली. नवभारताचे मंत्रजागर करणारे लोक निघाले ! यात्रेकरू निघाले. रघुवाथने एक नवीनच गाणे सांगितले.

« PreviousChapter ListNext »