Bookstruck

प्रथम मंत्र:

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »
हरिः ॐ ॥

हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजाम् | चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ||१||
तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम् | यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् ||२||
अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीम् | श्रियं देवीमुपह्वये श्रीर्मादेवी जुषताम् ||३||
कांसोस्मितां हिरण्यप्राकारां आर्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीम् | पद्मेस्थितां पद्मवर्णां तामिहोपह्वयेश्रियम् ||४||
चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलंतीं श्रियं लोके देवजुष्टामुदाराम् | तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्येऽलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे ||५||

हे अग्निदेवा, सुवर्णासारख्या वर्णाची, हरणासारखी चपळ, सुर्वण आणि चांदीचे अलंकार धारण केलेली, चंद्रासारखी शीतल, आल्हादायक आणि सुवर्णस्वरूप लक्ष्मी माझ्या घरी घेऊन ये. हे अग्निदेवा, जी प्राप्त झाली असता मी (अभ्युदयाचे द्योतक असे) सुवर्ण, गाय, घोडा आणि इष्टमित्र मिळवू शकेन, अशी अविनाशी लक्ष्मी माझ्या घरी घेऊन ये. जी रथामध्ये बसलेली असल्यामुळे जिच्यापुढे घोडे धावत आहेत अशा आणि जिचे आगमन हत्तीच्या चित्कारांनी माहीत होत आहे अशा देवी लक्ष्मीचे मी आवाहन करीत आहे. तिने माझ्यावर कृपा करावी. मी त्या लक्ष्मीला बोलावित आहे कीं, जी अवर्णनीय आहे, सस्मित आहे, जी हिरण्य (सुवर्णस्वरूप) आहे, जी अतिशय कोमल असून तेजस्वी आहे, जी स्वतः तृप्त असून भक्तांना तृप्त करते, जी कमलवर्णीय आहे, जी कमलावर विराजमान आहे, जी चंद्राप्रमाने सुखद प्रकाशमान आहे, जिची त्रिभुवनात कीर्ती आहे, जी सर्व देवांकडून पूजिली जाते, जिच्या आजूबाजूला कमळांचे वलय आहे, तिच्याजवळ मी स्वसंरक्षणार्थ जातो. हे जगन्माते, तू माझे दारिद्र्य नष्ट कर. मी तुला शरण आलो आहे.
Chapter ListNext »