Bookstruck

द्वितीय मंत्र:

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तववृक्षोथ बिल्वः | तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः ||६||
उपैतु मां देवसखः कीर्तिश्च मणिना सह | प्रादुर्भूतो सुराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे ||७||
क्षुत्पिपासामलां ज्येष्ठां अलक्ष्मीं नाशयाम्यहम् | अभूतिमसमृद्धिं च सर्वांनिर्णुद मे गृहात् ||८||
गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीम् | ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपह्वये श्रियम् ||९||
मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि | पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीः श्रयतां यशः ||१०||

हे सूर्यासारख्या तेजस्वी जगन्माते, तुझ्याच तपःसामर्थ्याने फुले न येताच फळे येणारा बिल्ववृक्ष (बेलाचे झाड) उत्पन्न झाला आहे आणि आता त्याची ती बिल्वफळे तुझ्याच तपोबळाने माझे अंतर्गत अज्ञान आणि बाहेर दिसणारे दैन्य नष्ट करो. हे लक्ष्मी, चिन्तामणी अथवा आपल्या कोषाध्यक्षासह कुबेर आणि यशाची देवता असणारी कीर्ती मला प्राप्त होवो. कारण मी या राष्ट्रात जन्मलो आहे. हे अग्निदेवा, मला लक्ष्मी लाभण्यापूर्वी तहानभुकेने आलेले मालिन्य आणि दारिद्र्य मी तिला प्रथम नष्ट करायला सांगेन आणि म्हणेन, हे महालक्ष्मी तू माझ्या घरातून संपन्नतेचा अभाव आणि दारिद्र्य नाहीसे कर. पराभवातीत असणाऱ्या, नित्य-समृद्ध असलेल्या, शुष्क शेणमाती केराच्या स्वरूपात राहाणाऱ्या पृथ्वीरूप महालक्ष्मीला मी माझ्या राष्ट्रात बोलावित आहे. हे लक्ष्मीदेवी, तू माझ्या ठिकाणी धनधान्यादि वैपुल्यस्वरूप लक्ष्मी आणि धवल कीर्ती स्वरूप लक्ष्मी नित्य वास्तव्यास असू द्यावी म्हणजे आम्ही तिच्याच वास्तव्याने आमच्या मनातील मनोरथ, मनाचा संतोष, सत्यवाणी, ऋजुता आणि गाई, घोडे, बैल, हत्ती वगैरे राष्ट्रोन्नतिकारक पशूंच्या समुदायासह राष्ट्रधारण - पोषणोपयोगी अन्नाचा साठा संपादन करू.
« PreviousChapter ListNext »