Bookstruck

आधार मिळाला 3

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''ते मुलांचे मित्र आहेत. त्यांना वाचायला पुस्तकें देतात, खाऊ देतात.''
''तुला काय माहीत ?''

''आमच्या वाड्यांतील शरद त्यांच्याकडे जातो.'' दोघे मित्र बोलत होते. घंटा झाली. दोघे आपापल्या वर्गात गेले.

रंगाची नि वासुकाकांची चांगलीच गट्टी जमली. इतर मुलांच्याहि तेथें ओळखी झाल्या. पंढरीहि तेथें यायचा. वांसुकाका मुलांना कधीं कधीं पोहायला नेत. रंगा. पंढरी दोघे पोहायला शिकले. रंगाला आंता कांही कमी नसे. पुस्तकें, रंग, कुंचले सारें मिळे. वासुकाका त्याला निरनिराळी चित्रें दाखवीत. त्यांतील फरक समजवून सांगत.

रंगाच्या आईला समाधान होतें. मुलाला मार्गदर्शक भेटला म्हणून ती देवाचे आभार मानी. परंतु एक निराळीच घटना झाली. अलीकडे काशी एका श्रीमंताकडे स्वयंपाकाला जात असे. परंतु श्रीमंताची राणी माहेरी गेली. श्रीमंतच घरीं असत. त्यांना वाढून काशी रात्रीं घरीं येई. एके दिवशी सायंकाळी काशी स्वयंपाक करत होती. तो रंगेल श्रीमंत तिच्याकडे बघत होता. काशीच्या लक्षांत ती गोष्ट आली.

''काय पाहिजे ?'' तिनें विचारलें.
''तुम्हीच'' तो म्हणाला.
''काय बोलतां ?''

''घरांत आज चोरी झाली आहे. माझ्या खिशांतले पैसे गेले. दुसरें तर कोणी आलें नव्हतें.''

''मला काय माहीत तुमचे पैसे ?''
''तुम्हांलाच त्यांची जरुरी असणार. दुसर्‍या कोणाला असणार ?''

''मी का चोर ? या विस्तवाची शपथ, मला माहीत नाहीं. मी दिवाणखान्यांत जातहि नाहीं.''
''मी पोलिसांत सांगणार आहे.''
''नका हो माझे धिंडवडे मांडूं''
''त्याला एकच उपाय आहे.''
''कोणता ?''

« PreviousChapter ListNext »