Bookstruck

श्री.. ची..कविता - ८

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

           तुझेच_रूप
         ---------------

आसवलेल्या डोळ्यात दिसे तुझे रूप
पाणावलेल्या पापण्यात दिसे तुझे रूप
बंद नैत्र कटाक्षातही दिसे तुझेच  रूप
या डोळ्यात फक्त दिसे तुझेच रूप
पाहावे जिकडे तिथे राही तुझे रूप
दिशातही भासे मला हे तुझेच रूप
तुझे रूप माझ्यात भिनले असे जणु,
की दुधात साखर मिसळावी अशी जणु..
प्रत्येक रूपात भासे मला तुझेच रूप..
माझ्या सावलीतही भासे मला तुझेच रूप..
एक रूपच तुझे नयनात माझ्या बसले असे..
की तुझ्याशिवाय याला काही न दिसे.
तुझेच रूप मी माझ्यातच मला दिसे..
जणु कृष्णात राधेचे प्रतिबिंब तसे दिसे..
===========================
*अधिकृत लेखन: श्रीधर कुलकर्णी*
===========================

« PreviousChapter ListNext »