Bookstruck

श्री..ची..कविता - ९

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

श्री..ची .. कविता :- ९
-------------------------------
एक ओळ माझी..
--------------------------------
एखादी ओळ माझी
 चंद्राची कोर होते
एखादी ओळ माझी
नाचणारा मोर होते,
 एखादी ओळ होते
ठुमकणारी वाट बनते
एखादी ओळ अशीही की
स्वतःशीच लाजुन हासते..
एखादी ओळ रूमाल बनुन
हळुच आपले डोळे पुसते
तर एखादी ओळ.माझी
केशरी जंतरमंतर करते..
एखादी ओळ प्रेमाची
 दोघातलं अंतर जुळवते
तर एखादी ओळ माझी
 फ़ुलपाखरा मागे धावते
 एखादी ओळ ज्योत बनुन
अंधारत दिवा लावते
तर  एखादी ओळ माझी ..
सरींमधे चिंब भिजवतें.
 एखादी ओळ माझी
आपलेच प्रतिबिंब बनवते..
तर एखादी ओळ  अशीही
माझे स्वरूप सांगुन जाते..
==================
*लेखन :- श्रीधर कुलकर्णी*
===================

« PreviousChapter ListNext »