Bookstruck

धर्मान्तर हें राष्ट्रान्तर

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
घडतां भूवर या निष्ठान्तर हिंदुत्वचि नुरते ।
म्हणुनि ते राष्ट्रान्तर ठरते ॥धृ०॥
मोगल सत्ता उधळायाचा
कशास आटापिटा शिवाचा
स्वातंत्र्याचा, हिंदुत्वाचा
परकी मोगल होते म्हणुनी सत्ता पर ठरते ॥१॥
मोगल नसते जर परके तर
वाटविण्याचे कां अवडंबर
कां नाही केले धर्मांतर
असती ही पूण्यभू तयां तर हिंदुत्वा वरते ॥२॥
धर्मातचि सीमा राष्ट्राची
धर्मांतर माडी दास्याची
स्वत्व नि भूमी बुडवायाची
नसते ठावे तर संभाजी धर्मांतर करते ॥३॥
अगणित हिंदु शीख वीरवर
श्री बंदा गुरु तेगबहादर
धर्माच्या मरती वेदीवर
इस्लामाला राष्ट्र आपले ते मानत नव्हते ॥४॥
किती पद्मिनी जाती जळुनी
प्रताप लढले राष्ट्ररक्षणी
कारण सत्ता होती यवनी
तेच अन्यथा मानसिंहपथ मोदे अनुसरते ॥५॥
ख्रिस्तोपासक येत कासया
दाखविण्याला कां भूतदया ?
संस्कृतिचा कां तिरस्कार या ?
हिंदुत्वच्छेदनी येत कां प्रेमाला भरते ॥६॥
संख्या आहे बल राष्ट्राचें
संस्कृतिमध्ये जीवन त्याचे
एकत्वा सांभाळायाचे
ती निष्ठा अन्यत्र ठेवता राष्ट्रा पोखरते ॥७॥
पितृ भू आणिक पुण्यभूमि ही
ज्याची त्याचा भारत राही
राष्ट्रियत्व अन्यांना नाही
जागृत राही राष्ट्र ते अशा निकषा वापरतें ॥८॥

« PreviousChapter ListNext »