Bookstruck

मनुष्य आणि त्याचा लाकडी देव

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एका गरीब मनुष्याला आपण खूप मोठे श्रीमंत व्हावे असे वाटत असे. त्याकरता तो एका लाकडी मूर्तीपुढे बसून त्या देवाची प्रार्थना करीत असे. असेच बरेच दिवस गेले. परंतु, तो मनुष्य काही श्रीमंत झाला नाही, उलट तो अधिकच गरीब होत चालला.

एके दिवशी तो इतका निराश झाला की, त्याने संतापाच्या भरात त्या मूर्तीला हातात घेऊन जमिनीवर दाणकन आपटले व तिचे तुकडे तुकडे केले. मूर्ति फुटताच आतून बर्‍याचशा मोहरा बाहेर पडल्या. ते पाहून तो मनुष्य खूपच आश्चर्यचकित झाला व म्हणाला, 'ह्या देवाने मार खाल्ल्यावरच मला द्रव्य दिलं. त्याची पूजा इतके दिवस करीत बसलो हा माझा मूर्खपणाच होय.'

तात्पर्य

- जेथे कल्पनेने कार्यभाग होत नाही, तेथे शक्तीच उपयोगी पडते.
« PreviousChapter ListNext »