Bookstruck

शेतकरी आणि बकरे

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एकदा देशात खूप मोठा दुष्काळ पडला. तेव्हा एका शेतकर्‍याने आपल्याजवळच्या कोंबड्या मारून खाल्ल्या. कोंबड्या संपल्यावर त्याने कोकरांना मारून खाण्यास सुरुवात केली. ते पाहताच सगळे बकरे एकत्र जमले आणि त्यांनी विचार केला की, कोकरे संपल्यावर शेतकरी आपल्यालाच मारून खाणार. त्याऐवजी आपण आधीच येथून पळून गेलेले बरे. असा विचार करून ते तेथून पळून गेले.

तात्पर्य

- पुढच्या संकटाची जाणीव होताच, ते टाळण्याची सावधगिरी राखणे योग्य होय.
« PreviousChapter ListNext »