Bookstruck

शेतकरी आणि त्याचे मुलगे

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एकदा एक म्हातारा शेतकरी अगदी मरावयास टेकला होता. तेव्हा त्याने आपल्या सर्व मुलांना जवळ बोलावून सांगितले की,

'मुलांनो, मी माझी सर्व शेती व बागा तुमच्या स्वाधीन करतो आहे. त्या जमिनीत कुठेतरी पैसा पुरलेला आहे, आणि तो सगळी जमीन खणल्यावर तुम्हाला मिळू शकेल.' एवढेच बोलून शेतकरी मरण पावला.

त्याच्या मुलांनी तो मरण पावल्यावर सगळी शेते अगदी खोल खणून पाहिली, परंतु द्रव्य काही सापडले नाही. परंतु, जमीन चांगली खणल्यामुळे, त्यावर्षी शेतात पुष्कळच चांगले पीक आले. ते पाहून आपल्या वडिलांच्या सांगण्याचा अर्थ काय होता, हे त्या मुलांच्या लक्षात आले व त्यांनी जमिनीची चांगली मशागत करण्याचे ठरविले.

तात्पर्य

- प्रत्यक्ष पैसा मिळाला म्हणजेच द्रव्य मिळाले असे समजू नये. पैसा कुठल्याही रूपात मिळू शकतो.
« PreviousChapter ListNext »