Bookstruck

सिंह आणि बैल

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एकदा एका सिंहाला, एखादा लठ्ठ बैल खाण्याची इच्छा झाली. म्हणून त्याने एका बैलाला सन्मानाने आपल्या घरी मेजवानीस येण्याची विनंती केली. बैलाने ती मान्य केली व तो सिंहाच्या घरी गेला. तेव्हा त्याला, मोठीमोठी भांडी व स्वैपाकाची इतर तयारी दिसली. ते पाहून तो बैल पळत सुटला, तेव्हा सिंह म्हणाला,

'मित्रा असा पळून का चाललास?'

बैल म्हणाला, 'ही सगळी तयारी पाहून मला कळून चुकलं आहे की, मेजवानीत बैलाचंच मांस असणार, तेव्हा त्या पक्वान्नात माझं रूपांतर होण्यापूर्वीच मी निघून जातो.

तात्पर्य

- कोणाच्या गोड बोलण्याला भुलून आपण त्याच्या जाळ्यात सापडलो तरी त्याचा दुष्ट हेतू लक्षात येताच आपण सावध होऊन निसटावे, यातच शहाणपण आहे.
« PreviousChapter ListNext »